आमदार समीर कुणावार यांनी केले हिंगणघाट येते नवीन लसीकरण केंद्रचे उद्घाटन.

✒प्रा.अक्षय पेटकर, वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी✒
हिंगणघाट,दि.26 एप्रिल:- कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हिंगणघाट मध्ये लसीकरण मोहीम वाढविण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय हिंगणघाट येथे लसीकरण संदर्भात बैठक संपन्न झाली होती. त्या बैठकीमध्ये आमदार समीर कुणावार यांनी लसीकरण केंद्र वाढविण्याची मागणी केली होती ती आज पूर्ण झाली असून आज दिनांक 26 एप्रिल सोमवार पासून जी बी एम एम हायस्कूल हिंगणघाट येथे नवीन लसीकरण केंद्र सुरू झाले आहे.
या कोरोना महामारी मध्ये लसीकरण करणे फार महत्त्वाचे आहे लसीकरण शिवाय पर्याय नाही, लसीकरण जास्तीत जास्त हिंगणघाट मध्ये झाली पाहिजे अशी इच्छा आहे म्हणून यासाठी प्रयत्न करतो आहे. याकरिता जास्तीत जास्त जनतेने लसीकरनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार समीर कुणावार यांनी जनतेला केले.
सदर उद्घाटन प्रसंगी आमदार समीरभाऊ कुणावार, हिंगणघाट शहराचे लोकनिर्वाचित नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, हिंगणघाट चे उपविभागीय अधिकारी चंद्रभानजी खंडाईत, तहसीलदार श्रीरामजी मुंधडा, हिंगणघाट न. प. मुख्याधिकारी अनिल जगताप, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सौ. कीर्तीताई कुचेवार, समाज सेवक संजयजी बोत्रा, समाज सेवक जेठानंदजी राजपूत, किरण वैद्य इत्यादी सर्व मान्यवर मंडळी सदर कार्यक्रमाला उपस्थित होते.