कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी वेकोलीच्या सास्ती टाऊनशिप येथील दवाखान्यात आक्सीजन बेड, आयसीयु बेड सुविधा करण्यात यावी: आमदार सुभाष धोटे.

50

कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी वेकोलीच्या सास्ती टाऊनशिप येथील दवाखान्यात आक्सीजन बेड, आयसीयु बेड सुविधा करण्यात यावी: आमदार सुभाष धोटे.

कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी वेकोलीच्या सास्ती टाऊनशिप येथील दवाखान्यात आक्सीजन बेड
कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी वेकोलीच्या सास्ती टाऊनशिप येथील दवाखान्यात आक्सीजन बेड

संतोष मेश्राम
राजुरा तालुका प्रतिनिधी

राजुरा:- देशात, राज्यात, जिल्हयात व ग्रामीण भागात सुध्दा कोरोना संसर्ग रौद्र रूप धारण करीत आहे. जिल्हयात दररोज १५०० च्या वर कोरोना पॉझीटीव रूग्ण निघत असल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणात भर पडत आहे. त्यामुळे क्षेत्रातील अनेक गावे कोरोना हॉटस्पॉट झालेली आहेत. या सर्व गोष्टीचा ताण चंद्रपूर येथील आरोग्य यंत्रणेवर झाला आहे. राजुरा उपजिल्हा रुग्णालय स्तरावर कोवीड केअर सेंटर असल्याने अनेक रुग्णांची दररोज भर पडत आहे. दिनांक २५/०४/२०२१ रोजी राजुरा उपविभागात २६३ रुग्णांची नव्याने भर पडल्याने गंभीर रुग्णांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे भरती करण्यास क्षमते अभावी अडचण निर्माण होत आहे. कोरोना रुग्णांची गैरसोय होत आहे. ऑक्सीजन अभावी व उपचारा अभावी अनेक रुग्णांना आपला जिव गमवाला लागत आहे.

राजुरा तालुक्यातील वेकोली क्षेत्रामध्ये जवळपास ३ ते ४ हजार कामगार कार्यरत असुन त्यांचे सुध्दा आरोग्याच्या सुविधे अभावी गैरसोय होत आहे. परीसरातील नागरीकांना व वेकोली कामगारांना आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने वेकोली बल्लारपुर क्षेत्र (सास्ती टाऊनशिप) येथील रूग्णालयामध्ये कोव्हिड १९ रुग्णांच्या उपचारासाठी येथे आक्सीजन बेड व आयसीयु बेड सुरू करण्यात यावे अशी विनंती आमदार सुभाष धोटे यांनी वेकोली बल्लारपूर क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.