यवतमाळ येथील बरलोटा हॉस्पिटल कॅन्टीनमध्ये दहा हजारांची रोख चोरी.

साहिल महाजन यवतमाळ प्रतिनिधी
यवतमाळ:- पर्स मधून दहा हजाराची रोख अज्ञान चोरट्याने चोरी केली. ही घटना बरलोटा हॉस्पिटल येथील कॅन्टीनमध्ये घडली मंगला संजय इंगोले (32) रा. महागाव कसबा ता. दारव्हा असे फिर्यादीचे नाव आहे. महिला कँटिनसमोरील ओट्यावर बसून पतिला जेवण चारत होती. यावेळी अनोळखी वेक्तीने पर्समधून दहा हजारांची रोख व आधार कार्ड चोरी केले. याबाबत यवतमाळ शहर पोलीस स्टेशन ला तक्रार देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे.