विद्यापीठ स्तरीय विद्यार्थ्यांच्या परिसंवाद स्पर्धेमध्ये रा. म. गांधी महाविद्यालयाच्या ७ विद्यार्थ्याना पुरस्कार

विद्यापीठ स्तरीय विद्यार्थ्यांच्या परिसंवाद स्पर्धेमध्ये रा. म. गांधी महाविद्यालयाच्या ७ विद्यार्थ्याना पुरस्कार

विद्यापीठ स्तरीय विद्यार्थ्यांच्या परिसंवाद स्पर्धेमध्ये रा. म. गांधी महाविद्यालयाच्या ७ विद्यार्थ्याना पुरस्कार

अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731

नागभिड—राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व यक्षविज्ञान महाविद्यालय नागभीड येथे वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, रसायनशास्त्र व पदार्थविज्ञान विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अभ्यासक्रमवार आधारित विद्यापीठ स्तरीय विद्यार्थ्यांच्या परिसंवाद स्पर्धेचा बक्षीस वितरण व निरोप समारंभ सोहळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल कोरपेनवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या परिसंवाद स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याचे प्रमुख अतिथी प्राचार्य ,डॉ. एस. जी. कुकरेंजा होते तर डॉ. सबाने व डॉ. सुधाकर पेटकर डॉ. राजेश डहारे, डॉ. दिलीप वाहाने, डॉ. दहेगवकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यामध्ये वनस्पतीशात्र विषयात सेमिस्टर द्वितीय तृतीय पारितोषिक कु. खुशबू अमदाबादी तर सेमिस्टर चार मधून तृतीय पारितोषिक कु. श्रावणी देशमुख हिने पटकाविला. सेमिस्टर सहा मधून प्रथम पारितोषिक कु. भाग्यश्री सिडाम हिने प्राप्त करून कु. वैष्णवी कायरकर हिने प्रोत्साहनपर पारितोषिक प्राप्त केला. प्राणीशास्त्र व रसायनशास्त्र विषयात सेमिस्टर द्वितीय मधून प्रथम पारितोषिक कु. केसर धम्मानी हिने प्राप्त केला.प्राणीशास्त्र विषयात सेमिस्टर चार मधून तृतीय पारितोषिक कु. किरण बुटले हिने प्राप्त केला. कु. आकांक्षा बुलबुले हिने रसायनशास्त्र विषयात प्रोत्साहनपर पारितोषिक प्राप्त करून पदार्थविज्ञान विषयात सेमिस्टर सहा मधून द्वितीय पारितोषिक प्राप्त केला.
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील एकूण १९७ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ज्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत यश संपादन केले. त्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
बक्षीस वितरण व निरोप समारंभ सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. अतुल नागपुरे यांनी केले तर आभार डॉ. विकास मोहतुरे यांनी मानले. या विद्यापीठस्तरीय विद्यार्थ्यांच्या परिसंवाद स्पर्धेला गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील परीक्षक प्राध्यापक वृंद, महाविद्यालयातील समस्त प्राध्यापकवृद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
विद्यापीठ स्तरीय विद्यार्थ्यांच्या परिसंवाद स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयातील समस्त प्राध्यापकवृद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.