प्रशासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची नागरिकांनी केली मागणी
किशोर किर्वे
महाड तालुका प्रतिनिधी
मो.९५०३०००९५९
महाड: मागील एक महिन्यापासून कोकणात उष्णतेमुळे हैराण झालेल्या मनुष्य व पशु पक्षी यांना पावसामुळे गारवा निर्माण होण्याऐवजी अवकाळी पाऊस व वादळवाऱ्यामुळे जनजीवन विस्कळित झाल्याचे दिसून येत आहे काही दिवसांपासून कोकणामध्ये तिव्र स्वरूपात उष्णता निर्माण झाल्याने पावसाची दाट शक्यता निर्माण झाली होती तसेही हवामान खात्याने अंदाज वर्तविण्यात आला होता.
अशातच दोन दिवसांपासून पाऊस काही ठिकाणी पडत असता महाड औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या उष्णतेमुळे व नष्ट होणाऱ्या वनसंपदामुळे तालुक्यामध्ये मोठे नुकसान होताना दिसत आहे गेली कित्येक वर्षांपासून महाड तालुक्यामध्ये वादळीवाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी कोसळत अनेक घरांचे आतोनात नुकसान झाले आहे.
हे लोकप्रिय लेख आपण वाचलेत का?
- महाराष्ट्राचा सिरोंचा पुष्कर कुंभमेळा विशेष: सिरोंचा पुष्करपासून राज्यशासन का बरं अलिप्त?
- पवित्र रमजान मास विशेष: रमजानच्या चंद्रदर्शनात प्रसन्नतेची पहाट!
- श्रीलंकेमध्ये नक्की चाललंय तरी काय? एक लिटर दूध मिळतंय २ हजार रुपयाला
यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे अशातच दोन दिवसांपासून झालेल्या नुकसानीचे प्रशासनाकडून त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे