नुकसान ग्रस्त भागांचे सॅटॅलाइट आणि ड्रोनच्या मदतीने ई पंचनामे करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

53

नुकसान ग्रस्त भागांचे सॅटॅलाइट आणि ड्रोनच्या मदतीने ई पंचनामे करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

जितेंद्र कोळी 

पारोळा प्रतिनिधी

संपर्क न.-9284342632

अवकाळी पावसाने जे नुकसान झालं, त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पारदर्शकपणे आणि तातडीने मदत मिळावी, यासाठी मानवी हस्तक्षेप टाळून माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने मोबाइलद्वारे ई-पंचनामे करण्यात येणार आहेत. सर्वेक्षणासाठी उपग्रह आणि ड्रोनची मदत घेण्यात येऊन संगणकीय प्रणाली वापरण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलीय.

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेत व्हावेत, पंचनाम्याबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ नयेत यासाठी येत्या जूनपासून ई-पंचनामे करण्यात येणार आहेत. नुकसानीची पाहणी करण्यासाठी उपग्रह आणि ड्रोनची मदत घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी सोमवारी दिली.

सह्याद्री अतिथीगृहात आयोजित केलेल्या विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या एकदिवसीय परिषदेत शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विभागांचे सचिव या वेळी उपस्थित होते. गेल्या काही वर्षांपासून सतत होणारा हवामानबदल, अवकाळी पाऊस, गारपीट आणि अवर्षण आदी अनेक समस्यांनी शेतकरी ग्रासला आहे.

शाश्वत शेतीसाठी अनेक उपाय केले जात असले तरी शेतकऱ्यांना शासनाकडून हक्काच्या मदतीची गरज असते. नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेत व्हावेत यासाठी आधुनिक माहिती तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये देण्यात येणाऱ्या मदतीत वाढ करण्यात आली आहे. याशिवाय राज्य आपत्ती प्रतिसाद निधीकडून (एसडीआरएफ) द्यावयाच्या मदतीचे वाढीव दर लागू करण्याबरोबरच आता तीन हेक्टर मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना मदत देण्यात येत आहे.

आपले शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना आधार देणे हेच आपले कर्तव्य असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी *नमो शेतकरी महासन्मान निधी* योजना जाहीर करण्यात आली आहे, तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेत आता शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पीक विम्याच्या पोर्टलवर नोंदणी करता येणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. वीज पडून होणारे मृत्यू आणि तीव्र उष्णतेमुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी खबरदारीच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

तीव्र उष्णता, गारपीट, अवकाळी पाऊस यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले आहे. त्यांना आधार देणे, त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे. मदत आणि पुनर्वसन विभागाकडून तातडीने पंचनामे करण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

संगणकीय प्रणालीचा वापर..

मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव ३० एप्रिल रोजी निवृत्त होत आहेत. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्य सचिव यांचा कार्यगौरव करीत विशेष सत्कार केला. शासन आणि प्रशासनात दुवा म्हणून काम करत केंद्र शासनाच्या योजना राज्यात गतिशील करण्यासाठी तसेच राज्य शासनाचा कारभार अधिक लोकाभिमुख करण्यासाठी श्रीवास्तव यांनी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत हा सन्मान करण्यात आला.