गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नाने मौजा कटेझरी ते गडचिरोली अशी बससेवा स्वातंत्र्यानंतर प्रथमच सुरू
मनोज एल खोब्रागडे
✍️सह संपादक✍️
मो .9860020016
गडचिरोली :- आज दिनांक 26/04/2025 रोजी गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नाने मौजा कटेझरी ते गडचिरोली अशी बससेवा स्वातंत्र्यानंतर प्रथमच सुरू करण्यात आली. गावात स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर प्रथमतः बस आल्यामुळे भागातील नागरिकांनी वाजत गाजत बसचे स्वागत केले. उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सदर बस सेवेचे उद्घाटन केले व गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच यावेळी पोलीस स्टेशन कटेझरी येथील प्रभारी अधिकारी पोउपनि यांनी हिरवा झेंडा दाखवून बस मार्गस्थ केली.
या बस सेवेमुळे आजूबाजूच्या 10 ते 12 गावांना लाभ होणार आहे. बससेवा सुरू झाल्यामुळे गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय होणार आहे. यामुळे गावातील नागरिकांचीही नेहमीची पायपीट वाचणार आहे. तसेच यामुळे पोलीस व जनता यांचे संबंध आणखी मजबूत होण्यास मदत होईल.