अपघात होवू दोघे जण जागीत मरण पावले तर एक जखमी.
त्रिशा राऊत नागपुर क्राइम रिपोर्टर
मो 9096817953
भिवापूर : – भिवापुर.बुट्टेबोरी वरून दुचाकी वाहनाने येत असलेल्या युवकाचा व सोबत असलेल्या ६० वर्षीय महिलेचा अज्ञात वाहनाच्या धडकेत गोडबोरी फाट्या जवळ अपघात होवू दोघे जण जागीत मरण पावल्याची दुःखद घटना आज २६ एप्रिल शनिवारला साडेपाच वाजताच्या सुमारास घडली असून या अपघातात पाच वर्षीय एक लहान मुलगा गंभीर रित्या जख्मी झाला आहे.
त्यामुळे साठगाव ता. चिमूर जि. चंद्रपूर येथे एकच शोककळा पसरली आहे. येथील रहिवासी असून ४० वर्षीय किशोर मेश्राम बुट्टेबोरी येथे कंपनीत कार्यरत आहे. ते ६० वर्षीय गुनाबाई देवरावजी मेश्राम व ५ वर्षीय मुन्ना उर्फ अतुल मेश्राम यांच्यासह बुट्टीबोरीहून भिवापूरच्या दिशेने दुचाकी वाहनाने येत होते. अशातच भिवापूर तालुक्यतील गोडबोरी फाट्याजवळ भिवापूर कडून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जबर दुचाकीला जबर धडक दिल्यामुळे किशोर मेश्राम, गुनाबाई हे रस्त्यावर गंभीररीत्या जखमी होवून जागीच मरण पावले. तर पाच वर्षीय मुन्ना उर्फ अतुल मेश्राम यात जबर जख्मी झाल्याने त्याला उपचारा करीता नागपूर रुग्णालयात हलविण्यात आहे. किशोर मेश्राम हे पत्नीची डिलीवरी झाली असल्याने पत्नी आणि नवजात बाळाला भेटण्यासाठी साठगाव येथे जात होते पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळचं होतं आणि त्यांची नवजातबाळासोबतची राहिली. सदरची भेट अपुर्णच घटना माहिती मिळताच भिवापूर पोलिसांचा ताफा घटना स्थळी पोहचून बचाव कार्यात मदत करण्यात आली. मृत्यु पावलेल्या दोघांचे मृत्यदेह भिवापूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.