5 वर्षीय चिमुकली गेली दूध आणायला गोठ्यात, 50 वर्षीय नराधमाकडून अत्याचार.

68

5 वर्षीय चिमुकली गेली दूध आणायला गोठ्यात, 50 वर्षीय नराधमाकडून अत्याचार.

5 वर्षीय चिमुकली गेली दूध आणायला गोठ्यात, 50 वर्षीय नराधमाकडून अत्याचार.
5 वर्षीय चिमुकली गेली दूध आणायला गोठ्यात, 50 वर्षीय नराधमाकडून अत्याचार.

✒साहिल महाजन, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी✒
यवतमाळ,दि.26 मे:- आज मोठ्या प्रमाणात महिला आणि मुलीवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे खरचं आज मुली आणि महिला सुरक्षित आहेत का? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कारण यवतमाळ जिल्हातील उमरखेड येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यामुळे सर्वीकडे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

यवतमाळ जिल्हातील उमरखेड एका 50 वर्षीय नराधमाने अवघ्या पाच वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले आहेत. संबंधित प्रकार हा एका व्हिडीओ क्लिपमुळे उघडकीस आला. आरोपी शेख नजीर शेख उस्मान दौला हा सध्या फरार आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांचा मोठा जमाव.
अत्याचाराची संबंधित घटना ही 8 मे रोजी उमरखेडच्या साणकवाडी परिसरात घडली आहे. पाच वर्षीय पीडित मुलगी ही दूध आणण्याकरिता आरोपीच्या गोठ्यामध्ये गेली होती. दरम्यान, आरोपीने मुलीसोबत गैरवर्तन करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. काही दिवसांनंतर एका व्हिडीओ क्लिपमुळे हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर आरोपीला तात्काळ अटक करून गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत उमरखेड पोलीस स्टेशन समोर मोठा जमाव दाखल झाला होता.

पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु
सदर क्लिप बघून पीडित मुलीच्या आईवडिलांनी पोलीस स्टेशनला धाव घेत हकीकत सांगितली. पोलिसांनी सदर फिर्यादीच्या रिपोर्टवरून ताबडतोब गुन्हा नोंद केला. पोलीस आरोपीच्या घरी गेले असता आरोपी हा फरार झाला होता. आरोपींविरुद्ध 376 अ, ब भादंवीसह 4, 8 पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत.