बुद्ध पोर्णिमेनिमित्त बुद्धविहार बांधकामाचे भूमिपूजन.
रमाबाई नगर येथे नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न.

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
राजुरा:- जगाला शांती व अहिंसेचा संदेश देणारे महाकारूणी भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती व बुद्धपोर्णिमेचे औचित्य साधून रमाबाई नगर वार्ड राजुरा येथे नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या हस्ते येथील बुध्दविहाराच्या उर्वरित बांधकामाचे भूमिपूजन पार पडले. तत्पूर्वी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या हस्ते भगवान तथागत गौतम बुद्धांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून द्विप प्रज्वलन करून वंदन करण्यात आले. अॅड. चंद्रशेखर चांदेकर यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. सामुहिक बुध्द वंदना घेण्यात आली.
या प्रसंगी नगरसेवक हरजितसिंग संधू, राजकुमार ढोके, रत्नाकर वनकर, भाऊराव देठे, श्रीकांत वाघमारे, रवींद्र ब्राह्मणे, राजु लबडे, गमतीदास रामटेके, रमेश रत्नपारखी, अरुण लबडे, सुनील मेश्राम, शारदा जगताप, तुळसाबाई खडसे, त्रिशलाबाई ढोके, शारदाबाई वावरे, ललिताबाई ढमके, रंजना ब्राह्मणे, वैशाली दुबे, रेखाबाई माथनकर, ज्योतीबाई लबडे इत्यादी नागरिक उपस्थित होते.