कोलार नदीवरील पुलाचा केंव्हा होणार ऊध्दार ? मोवाडवासीयांचा सवाल.

✒युवराज मेश्राम, नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒
नागपुर/मोवाड,दि.26 मे:- नागपुर जिल्हा व मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्याला जोडणारा मोवाड या गावातील अत्यंत पुरातन व ब्रिटीशकालीन कोलार नदीवरील नादुरूस्त पुल आता अत्यंत शिकस्त झालेला असुन तो केव्हांही खाली कोसळुन घातपात घडु शकतो. या पुलापासुन भविष्यात कसलाही अनुचीत प्रकार घडु नये म्हणुन केवळ त्याचा वेळोवेळी जिर्णोध्दार न करता तो सरसकट नव्याने बांधुन त्याचे रूंदीकरण करून डामरी रस्त्याच्या मापाएवढा बांधण्यात यावा अशी मागणी आता मोवाडसह परीसरातील नागरीकांकडुन करण्यात येत आहे.
मोवाड नगरपरीषदेची स्थापना १७ मे १८६७ ची असुन तीला आज १५४ वर्षाचा काळ होत आहे. त्याच्याही पुर्वीपासुन या पुलाचे बांधकाम करण्यात आले असावे असे या गावातील वयोवृंध्दांनी कळवीले. या पुलाला संरक्षण कठडे नाहीत, त्यामुळे मध्यप्रदेशातुन येणार्या कोणत्याही वाहणाच्या चालकाचा अंदाज चुकून, अनियंत्रीत होऊन वाहणे सरळ पुलाखाली कोसळुन अपघात झाल्याच्या घटना आता नवीन नाहीत. या पूलावरून दररोज रात्रीला दहा चाकी, अठरा चाकी, तसेच ५० टनपेक्षा जास्त जडकाऊ वाहनांची सतत वरदळ राहत असुन त्यामुळे आता पुलाला जागोजागी तडे गेलेले आहेत.
पुलाची रूंदी व काळानुरूप त्याची ऊंची मर्यादा अत्यंत लहान झाली असुन पावसाळ्याच्या दीवसात पुलावरून पुर वाहत असतो. तो ओसरेपर्यंत त्या पलीकडील शेतकरी व वाहनांना पुर ऊतरण्याची वाट वघावी लागत असते. कधी कधी पाण्याचा अंदाज चुकल्याने अनेकदा पुरात पाळीव जनावरे, शेतकर्यांची बैलजोडी, तसेच मोटरसायकली वाहण्याचेही प्रकार घडले आहेत. पुल लहाण व संरक्षण कठडे नसल्याने सायंकाळच्या वेळी मध्यप्रदेशातुन येणार्या जड वाहणांची चाके पुलाखाली ऊतरण्याचे प्रकारही अनेकदा घडल्याचे परीसरातुन बोलल्या जात आहे.
मोवाड येथील अत्यं जीर्ण, शिकस्त व नेहमी चर्चेचा विषय राहीलेल्या या पुलाकडे कोणताही राजकीय पक्ष, किंवा सामाजिक कार्यकर्त्यांचे लक्ष दिसुन येत नसल्याने या पूलामुळे भविष्यात ऊद्भवणार्या अघटीत घटनाचे निरसन करून याची दखल आता शासनस्तरावर घेण्यात यावी व त्या पुलाचे नव्याने बांधकाम करण्यात यावे अशी मागणी मोवाडसह परीसरातील अनेक गावातील नागरीकांनी केली आहे.