वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने बुद्ध पौर्णिमा निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम.

✒नीलम खरात, मुंबई प्रतिनिधी✒
मुंबई/मुलुंड,दि26 मे:- मुलुंड येथील डंपिंग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने बुद्ध पौर्णिमा निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्राण वायु देणा-या पिपळ वृक्षाचे रोपण करुन त्याला जगवण्याचा संकल्प घेण्यात आला.
त्यानंतर सामान्य नागरिकांना खीरदान आणि बिस्किट वाटप करण्यात आले. वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने सर्व आलेल्या पदाधिकाऱ्याचे, महिला आघाडी आणि युवा आघाडीच्या वतीने बुद्ध पोर्णिमा आणि जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.