ग्राम पंचायत दुर्गापूर वार्ड क्र ०३ च्या वार्ड मेम्बर विरुद्ध स्थानिक नागरिकांचा आक्रोश.

🖋️मनोज खोब्रागडे🖋️
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
चंद्रपूर :- ग्राम पंचायत दुर्गापूर च्या हद्दीतील सार्वजनिक शौचालयाची नाली चोकअप झाल्यामुळे संडासाचे घाण पाणी दुर्गापूर वार्ड क्र ०३ च्या रस्त्याने मागील ४ ते ५ दिवसापासून वाहत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे वार्डातील नागरिक आपली व्यथा स्थानिक वार्ड मेम्बरला सांगण्यासाठी गेले असता तुम्ही पुढचे ६ महिने आमच्या घरी पाय ठेवू नका असे अपमानजनक बोलून वापस पाठविले ही गोष्ट शिवसेना शाखा दुर्गापूर ला माहीत झाले असता शिवसेना उपतालुखा प्रमुख नागेश कडुकर यांच्या नेतृत्वाखाली वार्डातील नागरिकांनी आपला रोष व्यक्त करून दुर्गापूर वार्ड क्र ०३ च्या ग्राम पंचायत सदस्यांनी आपला त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. सारंग वाकोडे ग्राम पंचायत सदस्य, वार्ड नंबर ०२ दुर्गापूर प्रसंगी माजी ग्राम पंचायत सदस्या वार्ड क्र ०३ सपनाताई गणवीर, मुकेश हुमने, महेश निब्रड, अवि धवन, निरुपला दहिवले, मिलिंद मेश्राम, चेतन कामतवार, तोसिफ खान, शार्दूल गणवीर इत्यादी नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here