हिंगणघाट इंदिरागांधी वॉर्ड मध्ये पाण्याची भीषण टंचाई.

✒प्रा. अक्षय पेटकर, वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी✒
हिंगणघाट:- येथील इंदिरागांधी वॉर्ड मध्ये पाण्याची भीषण टंचाई चा सामना नागरिक करत आहे. इंदिरा गांधी वॉर्ड मध्ये मागील 3 – 4 वर्षापासून पाण्याची टाकीचे बांधकाम सुरू आहे. ते अजूनही काम पूर्णत्वास आलेले नाही. येनोरा रोड, हायवे, गार्डन रोड, हनुमान मंदिर रोड या सर्व परिसरातील सर्व विहीर बोअरवेल पूर्णतः पाण्याअभावी आटलेले आहे तरीही या बाबीकडे नगर पालिका हिंगणघाट प्रशासनाचे लक्ष दिसत नाही. तसेच या बाबीकडे वॉर्ड मेंबर ही डोळेझाक करत आहे लोक पाण्याअभावी भटकंती करत आहे. मागील वर्षीही पाण्याची हीच परिस्थिती होती तरीहि नगर पालिका हिंगणघाट प्रशासनाने इंदिरा गांधी वॉर्ड परिसरातील नागरिकां साठी पाण्याची कुठलीही व्यवस्था केली नाही. या परिसरात सार्वजनिक ह्यांडपंप नाही त्यामुळे बाहेर कुठून लोक पाणी भरू शकत नाही. या वर्षी मागील वर्षीच्या तुलनेत इंदिरा गांधी वॉर्ड येथील लोकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीत येक पानिदाता मोफत पाणी देत आहे. जे काम हिंगणघाट नगर पालिका प्रशासनाचे आहे ते काम महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष अतुलभाऊ वांदीले करतांना दिसत आहे.