खरीप हंगामासाठी खत बचतीची विशेष मोहीम.

47

खरीप हंगामासाठी खत बचतीची विशेष मोहीम.

खरीप हंगामासाठी खत बचतीची विशेष मोहीम.
खरीप हंगामासाठी खत बचतीची विशेष मोहीम.

🖋मनोज खोब्रागडे🖋
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
गोंदिया,दि.20 :- राज्यामध्ये रासायनिक खतांचा कमीत कमी व संतुलीत वापर होण्याच्या उद्देशाने खरीप 2021 मध्ये खत बचतीची विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये किमान 10 टक्के रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी मे महििन्याच्या चालू सप्ताहात सदर मोहिमेच्या प्रचार व प्रसिध्दीसाठी विशेष प्रयत्न कृषि विभागामार्फत क्षेत्रीय स्तरावर करण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध पिकांसाठी विशेषत: भात, तूर इत्यादीकरीता खत वापराचे विविध फायदेशीर पर्याय उपलब्ध करुन देणे, प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर जमीन सुपिकता निर्देशांक दर्शविणारा फलक प्रदर्शित करणे व त्याचे सामुहिक वाचन करणे, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा वापर करणे, जैविक खतांची बीज प्रक्रिया करणे, हिरवळीच्या खतांच्या बियाणाचे अनुदानावर वितरण करणे, भात पिकाकरीता युरिया ब्रिकेटचा वापर वाढविण्यासाठी त्याचे उत्पादन व वितरण करणे, कृषि सेवा केंद्र चालकांना प्रशिक्षण देणे, जमिनीत सेंद्रीय कर्बाची वाढ होण्यासाठी ऊसाची पाचट जागेवर कुजविणे, गांडुळ खत, कंपोस्ट खत यांचा वापर वाढवून रासायनिक खतांची मागणी कमी करणे आणि विविध पीक योजनेअंतर्गत प्रशिक्षण वर्ग व प्रात्यक्षिकांचे आयोजन करणे इत्यादी बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे. या मोहिमेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन देवरीचे उपविभागीय कृषि अधिकारी मंगेश वावधने यांनी केले आहे.