इंदिरा नगरचे नगरसेवक अमजद अली यांना सोबत घेऊन महिलांनी दारू विक्रेत्यांना दिली धमकी.

54

इंदिरा नगरचे नगरसेवक अमजद अली यांना सोबत घेऊन महिलांनी दारू विक्रेत्यांना दिली धमकी.

किती वेळा तक्रारी देऊनही पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला.

इंदिरा नगरचे नगरसेवक अमजद अली यांना सोबत घेऊन महिलांनी दारू विक्रेत्यांना दिली धमकी.
इंदिरा नगरचे नगरसेवक अमजद अली यांना सोबत घेऊन महिलांनी दारू विक्रेत्यांना दिली धमकी.

🖋मनोज खोब्रागडे🖋
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
चंद्रपूर:- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की,चंद्रपूर शहरातील इंदिरानगर परिसरात दारूविक्रेत्यांच्या घरांवर नगरसेवक अमजद अली यांच्या नेतृत्वात आज इंदिरानगर वासियांनी हल्लाबोल केला. यावेळी नागरिकांचा रोष उफाळून निघत होता. इंदिरानगर परिसरातील बिरेंद्र साना, सचिन कुंभारे, वंदना कुंभारे, सुरेखा गाळेकर हे दारूच्या व्यवसाय करतात. या संदर्भात अनेकदा नागरिकांनी पोलिसात तक्रार केली असूनही पोलिस विभागातर्फे कारवाई केल्या जात नसल्यामुळे दारू विक्रेत्यांची हिंमत वाढली असल्याचा आरोप नागरिक करित आहेत. महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी फक्त दारूविक्री होत असल्यामुळे मद्यपींची गर्दी जमा होते, त्याचा त्रास नागरिकांना होत असल्याचा आरोप करित यानंतर दारूविक्री केल्यास दारू विक्रेत्यांना धडा शिकविण्यात येईल अशी चेतावणी इंदिरानगर वासियांनी दारू विक्रेत्यांना दिली. यावेळी इंदिरानगरा तील नागरिकांनी पोलीस दारू विक्रेत्याकडे येऊन पैसे घेऊन जात असल्याचा गंभीर आरोप केला. दारूविक्री मुळे सदर परिसरातील वातावरण हे तापले असून त्यातून एखादी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दारू विक्रेत्यांनी यासंदर्भात नागरिकांना यापूर्वी जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या आहेत. त्यामुळे इंदिरानगरा तील नागरिक चांगलेस संतापले असून यानंतर असे प्रकार घडल्यास त्याच्या गंभीर परिणाम दारू विक्रेत्यांना भोगावा लागेल अशी चेतावणी यावेळी इंदिरा नगर येथील महिलांनी दारू विक्रेत्यांना दिली आहे.