जोगेश्वरीत प्रथमच वातानुकूलित स्टार शौचालयाची निर्मिती व उदघाटन समारंभ

जोगेश्वरीत प्रथमच वातानुकूलित स्टार शौचालयाची निर्मिती व उदघाटन समारंभ

जोगेश्वरीत प्रथमच वातानुकूलित स्टार शौचालयाची निर्मिती व उदघाटन समारंभ

🖋पूनम पाटगावे🖋
जोगेश्वरी मुंबई प्रतिनिधी
81497 34385

जोगेश्वरी :- जोगेश्वरीतील श्यामनगर तलाव परिसरानजीक आमदार व माजी राज्यमंत्री श्री.रवींद्र वायकर यांच्या संकल्पनेतून आणि आमदार निधीतून वातानुकूलित स्टार शौचालय उभारण्यात आले. या वातानुकूलित शौचालयाचे उदघाटन सन्माननीय आमदार श्री. रवींद्र वायकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. तेथील उपस्थित अनेक मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या शौचालयाचे लोकार्पण करण्यात आले.
जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील आमदार मा. श्री. रवींद्र वायकर यांनी जनतेला समाजोपयोगी असे जे जे काही उत्तम असे काही देता येईल ते ते सर्वकाही देण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असतात आणि आणि पाठपुरावा करून अनेकविध उपक्रम राबविले जातात. वातानुकूलित स्टार शौचालयाच्या उदघाटनप्रसंगी आमदार श्री. रवींद्र वायकर यांनी सांगितले की, “शौचालय हे प्रत्येक माणसाच्या जीवनात आरोग्याच्यादृष्टीने फार महत्वाचा घटक आहे आणि ते स्वच्छ, सुंदर असणे महत्वाचे असल्याने ते जास्तीतजास्त उत्तम प्रतीचे असणे गरजेचे आहे. आणि अशाप्रकारची सुंदर शौचालये अनेक ठिकाणी बांधण्याचा मानस आहे”. JVLR लगतचे हे शौचालय म्हणजे प्रवासी , रिक्षावाले, स्थानिक नागरिक, बाहेर ठिकाणाहून आलेले पाहुणे मंडळी अश्या सर्वांसाठी स्नानगृहदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. असेच शौचालय जोगेश्वरी पूर्वेकडील स्टेशनसमोर बांधण्याचे काम चालू असून ते लवकरात लवकर लोकार्पित करण्यात येईल.
या उदघाटनप्रसंगी मनपाचे सहाय्यक उपायुक्त श्री. ढाकणेसाहेब, विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत, शालिनी सावंत, नगरसेवक प्रवीण शिंदे, अनंत नर, विधानसभा समन्वयक भाई मिर्लेकर, रवींद्र साळवी, स्मिता साळसिंगीकर, लोना रावत, उपविभाग प्रमुख बाळा साटम, के पाठक, मयुरी रेवाळे, उपविभाग समन्वयक राहुल देशपांडे, महेश गवाणकर, शाखाप्रमुख संदीप गाढवे, बाळा तावडे, प्रदीप गांधी, मंदार मोरे, नंदू ताम्हणकर हर्षदा गावडे, समीक्षा माळी, सुचित्रा चव्हाण, रश्मी गोडांबे, वैशाली भिंगार्डे, व्यापारविभाग विधानसभा संघटक अनुरुद्र नारकर, राजेश हेगडे, स्विय सहाय्यक उमेश कदम, अनिल म्हसकर, सचिन निमकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते, शिवसैनिक उपस्थित होते.