शंभर टक्के शिवसेना तालुक्यात येण्यासाठी आपसांत असलेले मतभेद दूर करा – खासदार राजन विचारे !
नगरपंचायत निवडणुकीत ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी मदत केली आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत तुम्ही सुद्धा करा – आमदार गोगावले
📰मीडिया वार्ता न्यूज 📰
पोलादपूर प्रतिनिधी – सखाराम साने
संपर्क क्रमांक – +91 92094 83583
दिनांक – २५ मे २०२२
पोलादपूर(रायगड)-
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांपूर्वी पक्ष बळकटीसाठी शिवसेना पक्षाकडून दुसऱ्या टप्प्यातील शिवसंपर्क अभियान सुरू असून बुधवारी पोलादपूर शहरातील कॅप्टन मोरे सभागृहात शिव संपर्क अभियान गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक अभियान राबविण्यात आले.
खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली महाड विधानसभा मतदार संघातील शिव संपर्क अभियान ची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पोलादपूर तालुक्यातून करण्यात आली.
या शिवसंपर्क अभियानासाठी उपस्थित आमदार भरतशेठ गोगावले संपर्क प्रमुख सदानंद थरवळ, जिल्हा युवा अधिकारी विकास शेठ गोगावले, जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, विधानसभा संपर्कप्रमुख सुभाष पवार, पोलादपूर संपर्कप्रमुख किशोर जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद घोसाळकर, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, तालुका प्रमुख निलेश अहिरे तसेच शिवसेना युवासेना आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी खा. विचारे यांनी आपले मनोगत मध्ये आ. गोगावले याच्या काही आठवणींना उजाळा देत विधानसभा च्या दालनात विरोधकांना सलो की पळो करून सोडणाऱ्या मोजक्या 25 जणांमध्ये समावेश असल्याचे त्यांनी सांगितले आ. गोगावले यांनी केलेल्या व उल्लेख केलेल्या विकास कामाचा धागा पकडत गेल्या १५ वर्षात शिवसेना च्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकासकामे नंतर तालुक्यात १०० टक्के शिवसेनेची सत्ता हवी आज ४२ ग्रामपंचायत पैकी ३५ ग्रामपंचायत ताब्यात असल्या तरी तालुक्यातील संपूर्ण सत्ता असणे गरजेचे आहे यासाठी आपसांत असणारे मतभेद दूर करत संपर्क वाढवा असे मत व्यक्त केले.
या वेळी आ. गोगावले यांनी या मतदारसंघात केलेल्या विकास कामाची माहिती देत तालुक्यातील गावगावात विकास कामासाठी निधी ची कमतरता भासणार नसल्याचे सांगून पोलादपूर तालुका आजपर्यंत शिवसेनेच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला आहे तसाच तो भविष्यात उभा राहिला असा विश्वात व्यक्त केले.
तालुक्यातील ग्रामीण भागात आम. भरतशेठ गोगावले याच्या प्रयत्नाने विकास काम करण्यात येत असल्याचे विकास कामे नंतर तालुक्यातील गावागावात शंभर टक्के शिवसेना कशी निवडून येईल या साठी आपापसांत असलेले मतभेद दूर करणे गरजेचे असल्याचे रोखठोक मत खासदार राजन विचारे यांनी पोलादपूर येथे व्यक्त केले तर आमदार भरत गोगावले यांनी तालुक्यातील सभागृह ,नळपाणी रस्ते आदी सह विविध विकास कामे मार्गी लावल्याचे सांगत तालुका दुर्गम असला तरी शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभा राहिल्याचे मत व्यक्त केले.