मामा तलावात आणखी सापडले दुर्मिळ पंचमुखी शिवलिंग शिल्प

मामा तलावात आणखी सापडले दुर्मिळ पंचमुखी शिवलिंग शिल्प

मामा तलावात आणखी सापडले दुर्मिळ पंचमुखी शिवलिंग शिल्प
🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📞 8830857351

मूल, : – मूल तालुक्यातील मेजगाव येथील माता तलावाच्या खोदकामादरम्यान परत एकदा दुर्मिळ पंचमुखी शिवलिंग शिल्प सापडले आहे. भेजगाव येथील मामा तलावाचे खोलीकरण रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू आहे. तलावातील खोलीकरणाच्या कामामध्ये आतापर्यंत प्राचीन काळातीत अनेक मूर्ती तेथील मजुरांना मिळत आहेत. मागील चार-पाच दिवसांपूर्वी एक मूर्ती मिळाली होती. ती नेमकी कोणाची अग्निदेवाची की यमाची होय , यासाठी इतिहास अभ्यासकात संभ्रमावस्था निर्माण झाली होती. त्यानंतर ते अग्नीदेवतेची मूर्ती आहे हे अनेक अभ्यासकांनी सिद्ध केले. त्याच तलावात खोदकाम करताना परत एकदा अत्यंत दुर्मिक शिल्प आढळून आल्यामुळे गावकरी चकित झाले आहेत. नेमके हे शिल्प कशाचे, अशी चर्चा परिसरात रंगली आहे.
गावातील प्रतिष्ठित नागरिक विकास गांगलेशीवार यांनी गोडविपरी येथील इतिहास अभ्यामक अरुण झगडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी है शिल्प पंचमुखी शिवलिंगाचे असल्याचे सांगितले. या शिल्पाबाबत कळताच गावचे सरपंच अखिल गांगरेड्डीवार, प्रकाश गांगरेड्डीवार, धनराज गांगरेड्डीवार, सचिन गांगरेड्डीवार, तानाजी गांगरेड्डीवार किशोर गांग रेड्डीवार त्याचप्रमाणे काही गावकऱ्यांनी प्रत्यक्षपने जाऊन शिल्प सुरक्षित स्थळी ठेवले आहे. या तलावात अनेक शिल्प आढळत असल्यामुळे इतिहास अभ्यासकांचे सुगीचे दिवस आलेले आहेत.
पंचमुखी शिवलिंग हे अत्यंत दुर्मिळ शिल्प असून, विदर्भात त्याचे दर्शन दुर्लभ झाले आहेत. शिवाला दहा हात असलेले पंचमुखी मानले जाते. शिवाने पश्चिम मुख हे पृथ्वी तत्त्व म्हणून पूजले जाते. त्याचे उत्तर मुख हे जल तत्त्व, दक्षिण मुख हे तेजस तत्त्व आणि पूर्व मुख हे वायू तत्व म्हणून पूजले जाते. भगवान शिवाचे वरचे मुख हे आकाश तत्त्व म्हणून पूजले जाते. अशी माहिती गोंडपिपरीचे इतिहास अभ्यासक अरुण झगडकर यांनी दिली.