श्री विठ्ठल रखुमाई मंदिर २२ वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
✍️संतोष उध्दरकर.✍️
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞
म्हसळा: म्हसळा शहरातील गौवळवाडी ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने श्री विठ्ठल रखुमाई मंदिर २२ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, त्या निमिताने श्री सत्यनारायणाची महापुजेचे आयोजन करण्यात आले होते.वर्धापन दिनानिमिताने भरघोष कार्यक्रमाचे आयोजन करून सकाळी श्री विठ्ठल रखुमाई यांची अभिषेक पुजा, आरती, त्यानंतर पारंपारिक वेषभुषेत पालखी मिरवणुक, दुपारी स्नेहभोजन,सत्यनारायण पुजा, नंतर आरती व रात्री येणाऱ्या सर्व भाविकांना महाप्रसाद. सकाळपासुन श्री विठ्ठल रखुमाई यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची एकच गर्दी पहायला मिळाली. या वेळी वर्धापन दिना निमिताने तालुक्यातील राजकिय, शासकीय, पत्रकार, उद्योजक, आदि मंडळी उपस्थित राहुन श्री विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेण्यात आले व येणाऱ्या सर्व मान्यवरांचे म्हसळा गौळवाडी ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन म्हसळा गौळवाडी ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने उत्तम प्रकारे करण्यात आले होते, या कार्यकमात उपस्थित म्हसळा गौळवाडी ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष अशोक काते, सचिव नितीन दर्गे, मुंबई मंडळ अध्यक्ष रमेश खताते, मुंबई मंडळ सचिव प्रमोद काते, दिलीप कांबळे, माजी सभापती रविंद्र लाड, माजी सभापती महादेव पाटील, जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे, जेष्ठ पत्रकार उदय कळस, वकील मुकेश पाटील, तरुण उदयोजक सुजित काते, कौस्तुभ करडे, विशाल सायकर, संतोष कुडेकर, प्रदिप कदम,पत्रकार संतोष उध्दरकर, समीर लांजेकर, संतोष खताते, बाबु बोरकर, दिपल शिर्के, सुशांत लाड,तसेच गौळवाडी नवतरुण मित्र मंडळ, महिला मंडळ, सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.