बिबट्या च्या हल्ल्यात एक गंभीर
त्रिशा राऊत नागपुर क्राईम रिपोर्टर मो 9096817953
भिवापूर :- भिवापूर तालुक्यातील टोकावर शेवटच्या असलेले झमकोली गावापासून एक एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात गुरांसाठी गवत कापायला गेलेल्या एका तरुणावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना आज २६ मे सोमवारला सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली किशोर रमेश राऊत वय २३ वर्ष असे जखमी तरुणाचे नाव असून तो या बिबट्याच्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला आहे किशोर आपल्या शेतात गुरांसाठी गवत कापत असताना शेतात दबा धरून असलेल्या बिबट्याने त्याच्यावर जिवघेणा हल्ला चढवला बिबट त्याच्या नरडीचा घोट घेण्याच्या प्रयत्नात असताना त्याच्या वडीलाने प्रसंगावधान राखून आरडाओरड करत इकडे तिकडे मदत मागितली त्यामुळे बिबट्यानेतिथून पळून गेला आणि किशोरचा जीव वाचला त त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय उमरेड येथे नेण्यात आले मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला नागपूर येथील मेडीकल कॉलेज येथे पाठविण्यात आले किशोरची आई झमकोली टेकडी येथील सरपंच आहे या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.