न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल शिस्ते-बोर्ली पंचतनचा निकाल शंभर टक्के

न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल शिस्ते-बोर्ली पंचतनचा निकाल शंभर टक्के

✍️सचिन सतीश मापुस्कर✍️
श्रीवर्धन तालुका प्रतिनिधी
📞8698536457📞

दिघी – श्रीवर्धन येथील गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल शिस्ते – बोर्ली पंचतन चा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावीचा निकाल सलग आठव्या वर्षीही शंभर टक्के लागला असून शाळेने आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवत यश संपादन केले आहे. शाळेतून एकूण १४ विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले असून कुमारी आर्या सुनील गायकर 76.20% गुण मिळवून प्रथम क्रमांकाने पास झाली तर कुमार हर्ष राकेश परकर 72.60% गुण मिळवून द्वितीय क्रमांकाने पास झाला. तसेच कुमार श्लोक सचिन गायकर 69.60% गुण मिळून तृत्तीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, पालकांचे व शिक्षकांचे संस्थेच्या सचिव डॉ.दिप्ती देशपांडे मॅडम ,संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. पी. देशपांडे सर. विभागीय सचिव सन्मा. संत मॅडम मुबंई विभाग, श्रीवर्धन चे शाखा सचिव डॉ. मेश्राम सर व विभागाचे अधिक्षक डॉ. निलेश चव्हाण सर, तसेच शाळेचे मुख्याध्यापक संतोष मुरकर सर यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.