रायगड मधील ३५२ हेक्टर वरील शेतीचे नुकसान
अवकाळीचा सात तालुक्यात फटका; कृषी विभागाची नजर पहाणी
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- रायगड जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसात आंबा,उन्हाळी भात आणि भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या पथकांनी केलेल्या नजर पहानीत रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये ३५२ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. उर्वरित आठ तालुक्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाही.
यावर्षी पहिल्यांदाच अवकाळी पावसाने मे महिना गाजवला.अगदी महिन्याच्या सुरुवातीपासून कमी अधिक पावसाने हजेरी लावली. काही भागात हुलकावणी देणाऱ्या पावसाने महिन्याच्या तिसऱ्या हप्त्यात मात्र संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले.या पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला.कर्जत,पेण आणि रोहा या तीन तालुक्यातील कापलेल्या उन्हाळी भात पिकांचे अवकाळी पावसाने नुकसान केले. तर याच तालुक्यात काही प्रमाणात भाजीपाल्यांचे नुकसान झाले. पोलादपूर, उरण, पनवेल, कर्जत या चार तालुक्यातील आंबा पीक अवकाळी धोक्यात आले. यात प्रामुख्याने फळगळती , देठ कुजवा आणि फळांमध्ये साका पडल्याने फळे फेकून देण्याची वेळ बागायतदारावर आली आहे.
कर्जत,उरण, पनवेल, पेण ,रोहा, पोलादपूर, माणगाव या सात तालुक्याचा नजर पाहणी अहवाल जिल्हाध्यक्ष कृषी कार्यालयाला प्राप्त झाला आहे. या सात तालुक्यातील ११२ गावांना अवकाळीचा फटका बसला आहे. प्राथमिक अहवालानुसार ८७९शेतकरी बाधित झाले आहेत २३ तारखेपर्यंत ३५२.८४क्षेत्र बाधित झाले आहेत. उर्वरित आठ तालुक्यातील नुकसानीचा अहवाल अद्याप कृषी विभागाला प्राप्त झालेले नाही. दरम्यान पुढील दोन दिवस रायगड जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज देण्यात आला आहे.
सर्व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना आपापल्या भागातील नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या जो अहवाल आला आहे.तो नजर पहाणी अहवाल आहे. काही तालुक्याचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे. अंतिम अहवाल आल्यानंतरच नुकसानीचा अंदाज येईल.
वंदना शिंदे
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी