आनंदनगर तांड्यासाठी ८२ लाखांची पाणी पुरवठा योजना-पालकमंत्र्यांची घोषणा एरंडोल मतदारसंघातील आदर्श बांधणीबाबत पदाधिकार्‍यांचे कौतुकोदगार

43

आनंदनगर तांड्यासाठी ८२ लाखांची पाणी पुरवठा योजना-पालकमंत्र्यांची घोषणा

एरंडोल मतदारसंघातील आदर्श बांधणीबाबत पदाधिकार्‍यांचे कौतुकोदगार

आनंदनगर तांड्यासाठी ८२ लाखांची पाणी पुरवठा योजना-पालकमंत्र्यांची घोषणा एरंडोल मतदारसंघातील आदर्श बांधणीबाबत पदाधिकार्‍यांचे कौतुकोदगार
आनंदनगर तांड्यासाठी ८२ लाखांची पाणी पुरवठा योजना-पालकमंत्र्यांची घोषणा
एरंडोल मतदारसंघातील आदर्श बांधणीबाबत पदाधिकार्‍यांचे कौतुकोदगार

*मिडिया वार्ता न्यूज*
*जळगाव जिल्हा प्रतिनिधी*
*विशाल सुरवाडे*

दि.26- जळगाव -येथील एरंडोल तालुक्यातील आनंदनगर तांडा या गावासाठी ८२ लाख रूपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली असून लवकरच याची निविदा निघणार असल्याची घोषणा आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केली. मिळालेल्या सत्तेचा उपयोग सर्वसामान्यांसाठी विकासाचे साधन म्हणून करणार असल्याचे सांगितले . या गावात आयोजीत कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी आपल्या जुन्या मतदारसंघातील आठवणींना उजाळा दिला. तर, ना. पाटील यांनी केलेल्या परिश्रमामुळे मतदारसंघाची अतिशय मजबूत बांधणी झाल्याबद्दल पदाधिकाऱ्यांनी कौतुकोदगार काढले.

आनंदनगर तांडा येथे आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ना. पाटील यांचा हा जुना मतदारसंघ असल्यामुळे जुने पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आनंदनगर तांडा या गावासाठी ८२ लाख रूपयांच्या पाणी पुरवठा योजनेला मंजुरीची घोषणा केली. ही योजना मंजूर करण्यात आली असून याची निवीदा लवकरच काढण्यात येणार असून 15 लाखाचे सभामंडप व तांडा ते निपाने फाटा या रस्त्याचेही डांबरीकरण मंजूर करणार असल्याची ग्वाही दिली.

दरम्यान, आपल्या भाषणातून ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, एक नेता, एक विचार आणि एक झेंडा या आदर्शाला प्रमाण मानून आपण सर्वांनी या मतदारसंघात खूप कामे केली आहेत. आपली आजवरची वाटचाल ही संघर्षातूनच झाली असून यातून आपण घडत गेलो आहोत. जनतेची सेवा करण्याचा मूलमंत्र आपण कधीही विसरलो नाही. त्याच प्रमाणे जुने व नवे सहकारी हे अजूनही आपल्याशी जुळलेले असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

दरम्यान, याप्रसंगी उपस्थित पदाधिकार्‍यांनी एरंडोल तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला तयार करण्यात ना. गुलाबराव पाटील यांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. विशेष करून या तालुक्यात शिवसेनेची बांधणी ही अतिशय मजबूत झालेली असून येत्या तीस वर्षातही येथून शिवसेनेच्याच उमेदवाराला मताधिक्य मिळेल असा आशावाद पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला.

यावेळी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार केला तर ना.गुलाबराव पाटील यांनी जेष्ठांचा व शिफारस करलेल्या तालुक्यातील विविध समित्यांवर निवड करण्यात आल्याचा सत्कार पालकमंत्र्यांनी केला.

या प्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख महानंदा ताई पाटील, तालुका प्रमुख वासुदेव पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, उपतालुका प्रमुख रवि चौधरी, माजी सभापती दत्तू आप्पा पाटील, युवासेनेचे परमेश्वर राठोड , नायब तहसीलदार श्री शिरसाठ, तालुका पोलीस निरीक्षक श्री जाधव, सरपंच गजानन राठोड , उपसरपंच देशमुख राठोड, सौ. सेठाणी बाई राठोड, परिसरातील सरपंच गजानन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, आत्माराम राठोड, सुदाम जाधव, बुधा राठोड, लाला राठोड यांच्यासह परिसरातील शाखा प्रमुख पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उपसरपंच देशमुख राठोड यांनी केले तर आभार सरपंच गजानन राठोड यांनी मानले.