भाजपचा चक्काजाम
ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने भाजप संतप्त

ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने भाजप संतप्त
✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
देवळी 26/06/2021
राज्यात सत्तारुढ आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ देवळी शहर आणि ग्रामीण भाजपच्या वतीने शनिवार 26 रोजी 11 वा.वर्धा रोडवरील पॉवर ग्रीड वसाहतीसमोर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.याप्रसंगी राज्यशासनाचा निषेध करून घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे बुटीबोरी-तूळजापूर या चौपादरी महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी खोळंबली.
या प्रसंगी भाजपचे प्रदेश सचिव राजेश बकाने यांनी ठाकरे यांच्या आघाडी सरकारच्या चुकीने राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण संपले असून,शिक्षण आणि नोकरीतील ओबीसींचे आरक्षण जाऊ नये म्हणून भाजपाने आंदोलनात्मक पवित्रा घेतला असल्याचे म्हटले.फडणवीस सरकारने काढलेल्या अध्यादेशाबाबत राज्य सरकार न्यायालयात योग्य बाजु मांडू शकली नाही. त्यामुळे राज्यातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला धक्का बसला,असे बकाने यांनी म्हटले. आंदोलन यशस्वी करण्यासाठी पूर्व नप उपाध्यक्ष बंडू जोशी, शिक्षण सभापती नंदू वैद्य,बांधकाम सभापती मारोती मरघाडे, नगरसेविका सुनीता बकाने, मुरदगाव (खो.) चे सरपंच गजानन हिवरकर,राहुल चोपडा, किरण तेलरांधे,अंकित टेकाडे, ज्योती खाडे, रुपाली गरवारे, उमेश कामडी, इत्यादी भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.चक्काजाम करणाऱ्या सर्व भाजप कार्यकर्त्यांना देवळी पोलिसांनी ताब्यात घेऊन काही वेळानंतर सोडून दिले.