मिरजेत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महागाई विरोधात तीव्र आंदोलन.

✒मिरज प्रतिनिधी✒
मिरज;- कोव्हीड 19च्या प्रादुर्भावाने संपूर्ण जगाला विळखा घातला असून या महामारीमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाला. कष्टकरी, हातावरचे पोट असणारे व रोजंदारी करणाऱ्या जनतेचे गेली सव्वा वर्षे अतोनात हाल झाले आहे. त्यात बऱ्याच कंपनी बंद झाल्या तर काही कंपनीमध्ये कामगार कमी (कपात)करण्यात आले आहे.त्यातही गगनाला भिडणारी महागाई यामुळे सर्व जनता आपल्या कुटुंबाचे पोट कसे भरता येईल, मुला बाळांना व वयस्कर लोकांना जपणे व सांभाळणे सध्या जिकरीचे झाले आहे. त्यात लोकांना काम नाही ज्यांना आहे त्यांच्या पगारामध्ये कंपनीने कपात केलेली आहे.अशी परिस्थिती असताना केंद्र सरकारने व राज्य सरकारने पेट्रोल, डिझेल,गॅस,खाद्य तेल व इतर लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू महाग केलेल्या आहेत.तरी जीवनावश्यक वस्तू स्वस्त कराव्यात व जनतेस दिलासा द्यावा अन्यथा येत्या काळात संपूर्ण देशभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष (दक्षिण) महावीर कांबळे, उपाध्यक्ष चंद्रकांत खरात, उमरफारूक ककमरी, संजय कांबळे, मनोहर कांबळे,वसंत भोसले, अशोक लोंढे, चंद्रकांत सरवदे, सचिन कांबळे,मिलिंद कांबळे, सागर आठवले, प्रशांत कदम, निशांत भंडारे, शरद वाघमारे, दीक्षांत सावंत, सिद्धार्थ लोंढे, ऋषीकेश माने आदी उपस्थित होते.