बहुजन विकास खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रातील ओबीसींचे राजकीय आरक्षण नष्ट झाले : प्रा. अतुल देशकर.* *विविध मागण्यांसाठी भाजापाचे ब्रम्हपुरी येथे चक्का जाम आंदोलन.*

52

*बहुजन विकास खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रातील ओबीसींचे राजकीय आरक्षण नष्ट झाले : प्रा. अतुल देशकर.*

*विविध मागण्यांसाठी भाजापाचे ब्रम्हपुरी येथे चक्का जाम आंदोलन.*

बहुजन विकास खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रातील ओबीसींचे राजकीय आरक्षण नष्ट झाले : प्रा. अतुल देशकर.* *विविध मागण्यांसाठी भाजापाचे ब्रम्हपुरी येथे चक्का जाम आंदोलन.*
बहुजन विकास खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रातील ओबीसींचे राजकीय आरक्षण नष्ट झाले : प्रा. अतुल देशकर.*
*विविध मागण्यांसाठी भाजापाचे ब्रम्हपुरी येथे चक्का जाम आंदोलन.*

ब्रम्हपुरी :

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मागील काही दिवसांआधी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने वारंवार सरकारला आरक्षणा बाबत सूचना देण्यात आल्या तरीही राज्य सरकारने या कडे कानाडोळा केला. या कारणाने महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे 27% आरक्षण 0% टक्क्यांवर आले.

आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करण्याच्या मागणी सह शेतकऱ्यांना 700 रुपयांचा बोनस मिळावा, लॉकडाऊन काळातील वीज बील माफ करण्यात यावे, शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करावे या मागणीसाठी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी ब्रम्हपुरी विधानसभेच्या वतीने माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांच्या नेतृत्वात ब्रम्हपुरी येथील ख्रिस्तानंद चौकात चक्का जाम करून राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.

या वेळी प्रामुख्याने ब्रम्हपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा.अतुल देशकर, भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे, महामंत्री कृष्णा सहारे, विधानसभा प्रमुख प्रा.शेख सर, भाजपा ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाल, जि.प समाजकल्याण सभापती नागराज गेडाम, माजी जि.प सभापती संतोष तंगडपल्लीवार, पं. स सभापती रामलाल दोनाडकर, सिंदेवाही पं. स सभापती सौ.मंदा बाळबुद्धे, सावली पं. स उपसभापती रवींद्र बोलीवार, जि.प सदस्या दीपाली मेश्राम, जि.प सदस्या योगिता डबले,भाजाप जिल्हा उपाध्यक्ष डॉ. बालपांडे, जिल्हा सचिव माणिक पाटील थेरकर, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा वंदना शेंडे, माजी नगर परिषद उपाध्यक्ष रश्मी खानोरकर, सिंदेवाही पं. स गटनेते रितेश अलमस्त उपस्थित होते.

या आंदोलना प्रसंगी बोलतांना माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी राज्याचे बहुजन विकास मंत्री व ब्रम्हपुरी विधानसभेचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्यावर तोफ डागली. बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दारू सुरू करायला जेवढी शक्ती पणाला लावली तेवढी शक्ती ओबीसींचे राजकिय आरक्षण कायम ठेवायला लावली असती तर आज ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले नसते असे या वेळी अतुल देशकर म्हणाले. विजय वडेट्टीवार हे बहुजन विकास मंत्री नसून दारू मंत्री आहेत असा टोलाही देशकर यांनी वडेट्टीवारांना लगावला. या वेळी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत सरकारचा निषेध नोंदविला.

या प्रसंगी जेष्ठ नेते प्राचार्य अरुण शेंडे, सावली तालुका महामंत्री दिलीप पा.ठिकरे, भाजपा ओबीसी आघाडीचे तालुका अध्यक्ष शंकरदादा सातपुते, सिंदेवाही ओबीसी आघाडीचे अध्यक्ष संजय बोडणे, माजी जि.प सदस्य काशीनाथ पाटील थेरकर, माजी जि.प सदस्य भालचंद्र, माजी जि.प सदस्य रामू निहाटे, माजी जि.प सदस्य उमाजी कूथे, भाजप ब्रम्हपुरीचे माजी शहर अध्यक्ष फकिरा कुर्वे, शहर महामंत्री तथा नगरसेवक मनोज वठे, महामंत्री तथा माजी नगरसेवक मनोज भूपाल, कोषाध्यक्ष अरविंद नंदूरकर, सावली पं. स चे माजी उपसभापती तुकाराम ठिकरे, पं.स सदस्य प्रकाश नन्नावरे, उर्मिला धोटे, ममता कुंभारे, विलास उरकुडे, गणपत कोठारे,विनोद गड्डमवार वासुदेवराव बोडणे, प्रकाश ,बोरकर, शरद सोनवाने, प्रमोद मैंद तालुका सरपंच संघेटनेचे माजी अध्यक्ष गोपाल ठाकरे, साकेत भानारकर,यशवंत आंबोरकर, सुधीर सेलोकर,माजी उपसभापती नामदेव लांजेवार, माजी सरपंच ज्ञानेश्वर भोयर, सदाशिव ठाकरे, अशोक तुडूंलवार, विलास खरवडे, प्रा.संजय लांबे, प्रा.अशोक सालोटकर, नगरसेवक सागर आमले, नगरसेविका पुष्पा गराडे, माजी नगरसेविका अनघा दंडवते, माजी नगरसेविका डॉ. हेमलता नंदूरकर, दिलीप पंडित, भा.ज.यु.मो शहर अध्यक्ष प्रा.सुयोग बाळबुधे, भा.ज.यु.मो जिल्हा सचिव तनय देशकर, जिल्हा सचिव पूनेश गांडलेवार, जिल्हा कार्य. सदस्य लिलाराम राऊत, सदस्य रोशन मुद्देमवार, जिल्हा संयोजक राहुल कावळे, नगर महामंत्री रितेश दशमवार, महामंत्री स्वप्नील अलगदेवें, सचिव दत्ता येरावार, उपाध्यक्ष पवन जयस्वाल, अमित रोकडे, राहुल सुभेदार, ज्ञानेश्वर दिवटे, युवा नेते अविनाश मस्के, सोशल मीडिया तालूका संयोजक धीरज पाल, पिंटू आंबोरकर, जयंत झोडे, अरुण झंजाळ, विनोद नखाते, अभय कूथे, सचिन ठाकरे, हळदा सरपंच दौलत गरमळे, मुईचे सरपंच देवराव ननावरे, दिलीप राऊत, अरुण पाल, विजय जिभकाटे, दादाजी कुत्तरमारे, कोषाध्यक्ष अर्जुनभाऊ भोयर, दिवाकर गेडाम, तुळशीदास भुरसे, विनोद धोटे, पुष्पाताई शेरकी, प्रतिभाताई बोबाटे, छायाताई चकबंडलवार, गिरीश चिमुरकर, कीशोर वाकुडकर, नामदेव भोयर, नितिन कारडे, मनीष घुगुसकर, यांच्या सह ब्रम्हपुरी, सावली व सिंदेवाही तालुक्यातील भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.