शोकांतिका

51

शोकांतिका

शोकांतिका

प्रेमा सारखं सुंदर काहिच नसताना,
उदासिनता, एकांत, विरह, अश्रू
याच प्रेमात भेट म्हणून मिळतात…

खरच खुप प्रेम करतो गं तुझ्यावर,
मी नाही जगू शकत तुला सोडून,
तुझ्यासाठी मी काहीही करु शकतो,
त्याच्या या शब्दांना किती सहज
सत्य मानून भाळत असते ती …

पुन्हा नाही चुकणार कधीही,
फक्त एकदा माफ कर मला,
एक संधी देणार नाही का गं?
बच्चा… मी प्रॉमिस करतो तुला,
प्रत्येक चुक माफ करत असते ती
त्याच्या याच फसव्या शब्दांवर …

प्रेम म्हणजे अतूट बंधन
अणि आयुष्य समजणारी ती,
त्यात स्त्री म्हणजे उपभोगाची वस्तू
आणि टाईमपास म्हणून प्रेम करणारा तो …

चंद्र तारे तोडून आणण्याचा
त्याच्या आणाभाका,
हिच्या आयुष्यात वास्तवात
केवळ निखारे आणतील,
याची कल्पनाही नसते तीला …

डोळे बंद करुन केलेल्या,
आंधळ्या प्रेमाचा प्रवास
फक्त राजा राणीच्या सुंदर स्वप्नावरुन,
हिच्या उध्वस्त आयुष्या पर्यंतच असतो …

मुमताज मेल्यावर ताजमहल
बांधणारा हिचा शहाजहान,
मुमताज जीवंत असे पर्यंत
केवळ जमिनदोस्त करत असतो
हिच्या भावनांचा मनोरा …

विष पिऊन मृत्यू होऊ शकतो
हे सत्य तीला ही ज्ञात असताना,
विषाची परिक्षा हा तीचा मुर्खपणाच …

आंधळं प्रेम करण्यापेक्षा,
डोळस प्रेम करण्याचं शहाणपण
का सुचत नसावं तीला?

मजनूसाठी दगड झेलून
लैला होण्याची तीची तयारी असताना
याला मात्र कधीच मजनू होता आलं नाही …

हि देखील एक शोकांतिका म्हणावी की
हिला सुध्दा दगड झेलणारी सावित्री होऊन
कधीच ज्योतिबा शोधावा वाटला नाही….

कवी- निलेश पवार, भुसावळ
८३०८५५८७१०