सालोरी गावात ‘खरीप यशस्वितेसाठी ‘कृषी संजीवनी मोहीम’’

सालोरी गावात ‘खरीप यशस्वितेसाठी ‘कृषी संजीवनी मोहीम’’

सालोरी गावात ‘खरीप यशस्वितेसाठी ‘कृषी संजीवनी मोहीम’’

✍मनोज एल खोब्रागडे✍
सह संपादक मीडिया वार्ता न्यूज
मोबाईल नंबर 9860020016

सालोरी : – आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा येथील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी ग्रामीन कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम २०२२-२०२३ या अंतर्गत वरोरा तालुक्यातील सालोरी या ठिकाणी 25/6/2022 ला कृषी संजीवनी मोहिमेचे कृषी अधिकारी दुर्गे म्याडमच्या सहकार्याने आरंभ केला. दरवर्षी कृषी दिनाचे औचित्य साधून 1 जुलैपासून ही मोहिम राबविली जाते. मात्र तोपर्यंत खरीप पिकांचा पेरणी आणि जमीन मशागतीचा कालावधी सुरु झालेला असतो. ही बाब लक्षात घेऊन यावर्षी 1 जुलैपुर्वी ही मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 25 जूनपासून राज्यात कृषी संजीवनी मोहिमेस प्रारंभ झाला.
ग्राम कृषी विकास समितीच्या बैठक घेऊन शेतीचे नियोजन कसे करावे याबाबत सालोरी येथे अधिकारी दुर्गे माडम व कृषीदुताद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी कृषी संजीवनी मोहिम राबविण्यात आली. त्याअंतर्गत कृषी विभागातील अधिकारी व कृषीदुतांमार्फत शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या मोहिमेंतर्गत घेण्यात आलेल्या सभेत शेतकऱ्यांना बीबीएफ तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बीबीएफ तंत्रज्ञानाने पेरणी केल्यामुळे कमी पाऊस अथवा पावसात खंड पडल्यास सरीतील ओलाव्यामुळे पीक अधिक काळ तग धरून ठेवते तर जास्त पाऊस झाल्यास सरीतून निघून जाते. त्यामुळे दोन्ही परिस्थिती शेतकऱ्यांचे नुकसान न होता फायदाच होतो, असे याप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी दुर्गे म्याडमयांनी सांगितले.
उपस्थित विद्यार्थ्यांनी ऋतूजा कोरडे , आशिका मडावी,तन्वी कोलते, अश्विनी मोहरकर, सुजाता मूंढरे, चेतना खुणे या कृषीदूतांनी बीजप्रक्रियेबद्दल मार्गदर्शन केले. त्यामध्ये गावातील हौशी शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here