शिवसेनेचे 20 बंडखोर आमदार परतीच्या वाटेवर शिवसेना नेत्यांचा दावा

शिवसेनेचे 20 बंडखोर आमदार परतीच्या वाटेवर शिवसेना नेत्यांचा दावा

शिवसेनेचे 20 बंडखोर आमदार परतीच्या वाटेवर शिवसेना नेत्यांचा दावा

खुशाल सूर्यवंशी
राजुरा तालुखा प्रतिनिधी
8378848427

राजुरा : – एकनाथ शिंदे गटाकडून 40 पेक्षा जास्त शिवसेना आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला जात आहे. तर शिवसेनेच्या गोटातूनही मोठी बातमी पुढे आली आहे. बंडखोर आमदादरांपैकी तब्बल 20 आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेचे वरिष्ठ नेतेही या आमदारांशी वारंवार संपर्क साधत आहेत. भाजपमध्ये विलिन होण्यास या आमदारांचा विरोध असून, ते आता परतीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्तासंघर्ष खूप वाढला आहे. शिवसेनेचे अर्ध्याहून अधिक आमदार हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले असून, ते गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये अडकून पडले आहेत. या बंडखोर आमदारांशी शिवसेना नेत्यांचा संपर्क झाला आहे, असा दावा काही नेत्यांनी केला आहे. असे एकूण 20 आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत. त्यांच्यावर भाजपमध्ये शामिल होण्यासाठी दबाव टाकला जातोय. मात्र शिवसेनेशिवाय दुसऱ्या पक्षात विलीन होण्यास त्यांनी नकार दिल्याचे बोलले जात आहे.

बंडखोरांचे अनेक बाप- संजय राऊत

दरम्यान, दहिसर येथे आज शिवसेनेच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात संजय राऊत यांनी सर्वच बंडखोर आमदारांवर सडकून टिका केली. शिवसेनेचा बाप एकच असून तिकडे गेलेल्यांचे अनेक बाप आहेत. काही सूरतमध्ये, काही गुवाहटीत, काही दिल्लीत तर काही मुंबईत आहेत. त्यामुळे अशा लोकांना समाजात मान्यता नसते, अशा शब्दात संजय राऊतांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांवर टीकास्त्र सोडलं.

भाजपची सावध भूमिका

कालच देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यात गुजरातमध्ये बैठक झाल्याची माहिती समोर आली. तर आज मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरही भाजपची महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार आदींची उपस्थिती आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेतल्यावर सत्ता स्थापनेसाठी भाजप कशा प्रकारे दावा ठोकू शकतं, सत्तेसाठी आणखी काय मोर्चेबांधणी करावी लागेल, यासंबंधी या बैठकांत चर्चा सुरु असल्याचं सांगितले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here