झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त वृक्षारोपण
संजय महाजन
शिर्डी प्रतिनिधी
लोणी काळभोर- झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सिंहाचा वाटा आहे. महाराणी लक्ष्मीबाई यांचे मूळ नाव मणिकर्णिका होते. राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९३५ रोजी झाला. मोरोपंत तांबे आणि भागीरथीबाई हे त्यांचे आई-वडील होते. १८४२ मध्ये राणी लक्ष्मीबाई यांचा विवाह झाशी संस्थानचे महाराजा गंगाधरराव नेवाळकर यांच्यासोबत झाला.
नेवाळकर यांच्या मृत्यूनंतर राणी लक्ष्मीबाई यांनी स्वतः संस्थानचा कारभार पाहिला. संस्थानाचे काम पाहत असताना राणी लक्ष्मीबाई यांनी व्यायाम, कसरत, घोडेस्वारी, तरवारबाजी याचाही सराव सुरूच ठेवला होता. राणी लक्ष्मीबाई यांनी आपल्या आपल्या शौर्याच्या जोरावर इंग्रजांविरोधात लढा दिला. वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी १८ जून रोजी इंग्रजाशी लढताना त्यांचे निधन झाले.
राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि.१८ जुन २०२३ रोजी ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य च्या वतीने तीर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर डोंगर परिसर येथे वनविभाग च्या हद्दीत करंज,चिंच, कडुलिंब, खैर, वड वृक्ष लावून पुण्यतिथी साजरी करण्यात आली तसेच अभिवादन करण्यात आले या वेळी ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप, जीवन जाधव, बिरूदेव भास्कर, अभिषेक शेंडगे, निरक बिका,वैभव काळभोर, विशाल लष्कर उपस्थित होते.