कर्जत शहरातील सी.सी.टिव्ही कॅमेरे १० चालू तर ५१ सलाईनवर

कर्जत शहरातील सी.सी.टिव्ही कॅमेरे १० चालू तर ५१ सलाईनवर

कर्जत शहरातील सी.सी.टिव्ही कॅमेरे १० चालू तर ५१ सलाईनवर

कर्जत शहरातील सी.सी.टिव्ही कॅमेरे १० चालू तर ५१ सलाईनवर

संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
९०१११९९३३३

कर्जत : – कर्जत नगरपरिषद हद्दीतील कर्जत शहरामध्ये सन २०२० साली शासकीय निधीमधून साधारण ५१ सी.सी.टिव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. मात्र त्यापैकी सध्य स्थिती मध्ये केवळ दहा कॅमेरे सुरू असल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. याकडे नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी समन्वय साधून कॅमेरा सुरू करावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे.

दिवसेंदिवस कर्जत शहर व्यापक होत असून मागील पाच सात वर्षांपासून शहरात नागरीकीकरण वाढले आहे. शहरात अनेक छोट्या – मोठ्या चोऱ्या, छोटे – मोठे गुन्हे घडताना दिसून येत आहेत. यासाठी शहरात सी.सी.टिव्ही कॅमेरे महत्वाचा दुवा ठरत असतात. हि बाब लक्षात घेऊन तत्कालीन नगरसेवक नितीन सावंत यांच्या प्रयत्नाने शासकीय निधीमधून एकूण ५१ कॅमेरा बसवण्यात आले. मात्र यापैकी फक्त दहा कॅमेरे सुरू असून यामुळे शहरात असुरक्षितता जाणवत आहे. अलीकडे अग्निशामक दल येथून मुद्रे गावाकडे येणाऱ्या गवणीच्या रस्त्याला पायी चालणाऱ्या महिलेची सोनसाखळी चोरीची घटना ताजी असताना अद्यापही सोनसाखळी चोरांचा तपास लागला नाही. या रस्त्याला कुठेही कॅमेरा नसल्याने तपासात अडचणी निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक घटनांचा तपास घेताना पोलिसांना सी.सी.टिव्ही महत्वाचा दुवा ठरत आहेत. कर्जत बाजारपेठेतील मुख्य चौकात / नाक्यावर कॅमेरा नसल्याचेहि निदर्शनास येत आहे.

दरम्यान कर्जत नगरपरिषद वतीने कर्जत शहरात १७० कॅमेऱ्याचा प्रकल्प तयार असुन निधीअभावी ही योजना प्रलंबित आहे. कागदोपत्री असलेल्या ५१ कॅमेरा पैकी फक्त २८ कॅमेरा लावलेले दिसून येत आहेत. तर उर्वरित कॅमेरे नक्की कुठे लावले आहेत? हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे. तूर्तास ५१ कॅमेऱ्याची दुरुस्ती करून कॅमेरा सुस्थितीत व्हावेत ही मागणी नागरिकांन कडून जोर धरू लागली आहे.

==========

प्रतिक्रिया,
कर्जत शहरात लावलेल्या कमेराचे देखभाल दुरुस्तीचे कोणतेही काम कर्जत नगरपरिषदकडे नसून त्याचे पूर्ण सेटअप कर्जत पोलीस ठाणे यांच्या कडे आहे.

वैभव गारवे,
(मुख्याधिकारी तथा प्रशासक)