माणगांव -बामणोली रस्त्यावरील अर्धवट अवस्थेतील पुलामुळे नागरिकांचा जीव धोक्यात कत्राटधाराच्या हरगर्जी कांरोभारामुले नागरिक व विध्यार्थी त्रस्त….
✍️-सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞
रायगड :-माणगांव तालुक्यातील माणगांव बामणोली रस्त्यावरील गोद नदीवरील पुलाचे काम चालू असताना जो पर्यायी रस्ता दिला आहे तो नदीपात्रातूनच दिला आहे. या पावसाळ्यात या गोद नदीला मोठया प्रमाणात पाणी येतो या पाण्यातूनच खासगी वाहने वाट काढीत रस्ता पार करतात मात्र रात्रीच्या वेळेस स्थानिक नागरिकाना व शाळा महाविद्यालयातून पायी जाणाऱ्या विदयार्थ्यांना मात्र नदीच्या पात्रातुन धोकादायक स्थितीत प्रवास करावा लागत आहे. तर आधीच व्याधीने त्रस्त असलेले नागरिक उपचारासाठी माणगांव येथील उपजिल्हारुग्णालय माणगांव किंवा प्राव्हेट दवाखान्यात जात असताना त्यांना या पुलामुळे बाह्यरस्ता म्हणून सात ते आठ किमी जीवावर उदार होऊन प्रवास करावा लागत आहे.
पावसाळा सुरु झाल्यापासून माणगांव बामणोली रस्त्याची दुरवस्था झाली आहे.या मार्गांवरून वाहन चालवीने कठीण झाले आहे.जून च्या पहिल्या आठवड्यात पुलाचे काम पूर्ण करून खरवली, सुरव, मांगवली, राजीवली, बामणोली ग्रामस्थांना येण्या जाण्यासाठी रस्ता सुरळीत करून देऊ असं आस्वासन देण्यात आला होता मात्र पावसानी जून च्या पहिल्याच आठवड्यात दमदार हजेरी लावली असून जून महिना संपायला आला आहे परंतु पुलाचे काम अद्याप पूर्ण झालं नाही अजून किती दिवस ग्रामस्थांना तसेच शाळकरी विदयार्थ्यांना या पर्यायी बाह्य रस्त्याचा वापर करावा लागणार आहे व नदीपात्रातून दिलेल्या रस्त्यावरून कसरत करावी लागणार आहे.या पुलाचे अर्धवट अवस्थेत असल्याने नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत.