सिंदेवाही तालुक्यात रेती तस्करी करणाऱ्या चार ट्रॅक्टर जप्त.

सिंदेवाही तालुक्यात रेती तस्करी करणाऱ्या चार ट्रॅक्टर जप्त.

त्या चार ट्रॅक्टर वर 4 लाख 68 हजार 860 रुपयांचा ठोठावला दंड.

जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही प्रतिनिधी
8806689909

सिंदेवाही :- सिंदेवाही तालुक्यात अवैध गौण खनिजांची विना रॉयल्टी वाहतूक दिवसेंदिवस वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने निर्णायक कारवाई करत चार ट्रॅक्टर जप्त केली आहेत.
सविस्तर वुत्त असे कि.
तालुक्यात मागील एका महिन्या मध्ये वाळु / रेती अवेध गौणखनिज उत्खनन करुन वाहतुक करतांना संदिप पानमंद, तहसीलदार, सिंदेवाही व त्यांचे गौण खनिज दक्षता पथकांनी दिनांक 26/05/2025 रोजी रात्रो 12.30 वाजता सिंदेवाही तालुक्यातील मौजा विरव्हा येथील उमा नदी घाटाजवळ वाहन टॅक्टर सोनालिका विना क्रमांकाची , दिनांक 29/05/2025 रोजी रात्रो 1.30 वाजता मौजा आंबोली येथे वाहन टॅक्टर क्रमांक MH 34 DU 7000, दिनांक 07/06/2025 रोजी रात्रो 1.00 वाजता मौजा आंबोली येथे वाहन टॅक्टर क्रमांक MH 34 BR 4307 व दिनांक 11/06/2025 रोजी रात्री 10.00 वाजता मौजा भेंडाळा येथे वाहन टॅक्टर असे एकुण 4 वाहने 4 ब्रास अवैध रेती उत्खनन करुन वाहतुक करतांना आढळुन आले सदर वाहन जप्त करुन तहसील कार्यालय सिंदेवाही येथे जमा करण्यात आले आहे.
सिंदेवाही तालुक्यातील अवैध उत्खनन करुन वाहतुक करतांना मिळालेल्या या चार टॅक्टर वाहनावर शासन नियमानुसार रक्कम 4,68,860/- दंडात्मक कार्यवाही प्रस्ताव मा. उपविभागीय अधिकारी, चिमुर यांच्याकडे सादर करण्यात आले आहे.अशी माहिती तहसीलदार पानमंद यांनी सांगितले आहे.
या कारवाईमुळे महसूल विभागाच्या भूमिकेला बळ मिळाले असून, खनिज माफियांना धडकी भरली आहे. पुढील काही दिवसांत अशा प्रकारच्या आणखी कारवाया होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे वाळू तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.