जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांना जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन केली पाहणी*

*जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांना जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन केली पाहणी*

जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांना जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन केली पाहणी*
जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांना जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन केली पाहणी*

मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मिडीया वार्ता न्यु-8208166961

अकोला : – येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असणाऱ्या विविध शासकीय कार्यालयांना आज जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांचे समवेत अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे उपस्थित होते.

आज जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा यांनी उपविभागीय कार्यालय, पुरवठा विभाग, जिल्हा कोषागार कार्यालय, भुमी अभिलेख कार्यालय, महिला व बाल विकास विभाग, समाज कल्याण विभाग, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व स्वयंरोजगार केंद्र, महिला व बाल विकास विभाग, राज्य उत्पादन शुल्क, सूचना व प्रसारण विभाग, अभिलेख कक्ष, जिल्हा माहिती कार्यालय व निवडणूक कार्यालय आदी विभागांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी संबंधित कार्यालय प्रमुखांकडून विभागाच्या कामकाजाचे स्वरुप, रचना, कर्मचारी संख्या आदींबाबत माहिती घेतली. तसेच कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.