“हिंगणघाटच्या काळा गोटा परिसरात रात्री दगडफेक
पोलिसांनाही करावा लागला सामना
अनेक जण जखमी

पोलिसांनाही करावा लागला सामना
अनेक जण जखमी
✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
हिंगणघाट 26/07/21
शहरातील चोखोबा वार्ड येथील काळा गोटा परिसरात काल 24 रोजी रात्रीपासून अचानक दगडफेक सुरू झाली असून परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. याप्रकरणी परिसरातील नागरिकांनी दगडफेकीबद्दल पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांची चमु घटनास्थळी पोहोचली. रात्री 11 वाजेपर्यंत पोलिसांनी घरोघरी पाहणी केली. परंतु, तपासादरम्यान गोटमार करीत असल्याचे पुरावे आढळले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री 8 वाजताचे सुमारास सुरू झालेल्या दगडफेकीतअनेक युवक, पुरुष, महिलासुद्धा जखमी झाल्या आहेत. पोलिसांनासुद्धा या दगडफेकीचा सामना करावा लागला असे प्रत्यक्षदर्शीन्नी सांगितले. या परिसरात गरीब, अशिक्षित, कामगार रहिवासी असून त्यांचीसुद्धा हा कुणी अतृप्त आत्म्याचाच प्रताप असल्याचा विश्वास आहे. या काळा गोटा परिसरात ब्रिटिशकालीन गोर्या साहेबांच्या समाधी असून याच आत्म्याच्या तर प्रताप नाही ना?असा अंधश्रद्धाळूंचा कयास आहे.
या परिसरातील समाजसेवक युवकाने येथे असलेल्या समाधी परिसराची स्वच्छता करण्यात यावी यासाठी अनेकदा प्रयत्न केले. परंतु, अलिकडेच काही महिन्यापुर्वी त्याने फाशी घेऊन आत्महत्या केली. आता या परिसराची स्वच्छता करावी यासाठीच तो प्रेतात्मा असा प्रकार करीत आहे, अशीही अंधश्रद्धेतुन चर्चा आहे.
प्रकार काहीही असला तरी पोलिस येऊनसुद्धा हा गोटमार करणारा आरोपी न सापडल्याने हा प्रकार अज्ञात शक्तीच करीत असल्याचे भावनेतुन परिसरात दहशत पसरली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याची दखल घेऊन या मागचे कारण शोधावे, असे आवाहन परिसरातील नागरिकांनी केले .