सख्ख्या अल्पवयीन भावाचा अल्पवयीन बहिणीवर बलात्कार

सख्ख्या अल्पवयीन भावाचा अल्पवयीन बहिणीवर बलात्कार

सख्ख्या अल्पवयीन भावाचा अल्पवयीन बहिणीवर बलात्कार
🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📱 8830857351

वर्धा, 25 जुलै : – सख्ख्या भावानेच आपल्या लहान बहिणीवर बलात्कार केल्याची घटना उजेडात आली असून या प्रकरणी अल्पवयीन आरोपी भावाला ताब्यात घेण्यात आले आहे. मुलीचे पोट दुखत असल्याने आईवडील तिला सेवाग्रामच्या रुग्णालयात घेऊन गेले. त्यावेळी डॉक्टरांना धक्का बसला. कारण, ही पंधरा वर्षीय मुलगी सहा महिन्यांची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. आईवडील बाहेर गेले असता तिच्या सतरा वर्षीय भावाने बळजबरी केली. त्यातून तिला दिवस गेले. हे कळताच कुटुंबीयांनी तडक वर्धा शहर ठाणे गाठले व तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी भावाला ताब्यात घेतले.