गरीब व गरजू विद्यार्थ्याना दिशा परिवार ची शिष्यवृत्तीचे फॉर्म वाटप बाबत
✍मनोज एल.खोब्रागडे✍
सह संपादक मीडिया वार्ता न्यूज
मोबाईल नंबर -9860020016
पुणे : – आमची संस्था मागिल १५ वर्षा पासून महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यातील गरीब व गरजू विद्यार्थ्याना १२ वी
नंतरचे शिक्षण पूर्ण करण्याकरिता दात्यांच्या माध्य्मातून आर्थिक मदत करीत आहे . या उपक्रमामुळे मागील १५
वर्षात ४ हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्याना फायदा झाला आहे.
या शैक्षणिक वर्षात गरजू विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते कि ज्या विद्यार्थ्यांना १२ वी परिक्षेत ८०%
गुण प्राप्त झाले आहेत अशा विद्यार्थ्यांना कला, वाणिज्य,अभियांत्रिकी , फार्मसी ,नर्सिंग या शाखेतील विद्यार्थ्यांना
संस्थेकडे उपलब्ध निधीनुसार मदत दिली जाईल.
त्याकरिता दिनांक १५ जुलै ते १५ ऑगस्त सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंतविनामूल्य अर्ज मिळतील . तरी
गरजू विद्यार्थ्यांनी वरील नमूद वेळेप्रमाणे संस्थेच्या सरोज भवन ,विद्यार्थिनी वसतिगृह ,बालाजी पार्क , लेन नंबर ३
शाहू बॅंकेजवळ ,केसनंद रोड, वाघोली येथून शिष्यवृत्तीचे फॉर्म घ्यावेत.
ज्या विद्यार्थ्यांना आई ,वडील नाहीत तसेच अल्पभूधारक अल्प उत्पन्न गटातील पालकांची मुले यांना
पने मदतीचा विचार केला जाईल
प्रसिध्दी साठी – गरीब व गरजू विद्यार्थ्याना दिशा परिवार ची शिष्यवृत्तीचे फॉर्म वाटप सुरू आहे.
कार्याध्यक्ष. दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्ट पुणे