सास्ती साजाच्या महिला पटवारी दिपाली भडके एसीबीच्या जाळ्यात!
“ताईने”मागितली होती २०हजार रुपयांची लाच!
प्रकरण होतेय शेतजमीन फेरफारचे
खुशाल सूर्यवंशी
राजुरा तालुखा प्रतिनीधी
8378848427
चंद्रपूर-◼चंद्रपूर जिल्हा पटवारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तलाठी विनोद गेडाम यांना दि.१९जूलैला एका लाच मागणी प्रकरणात संध्याकाळी अटक झाल्यानंतर त्या प्रकरणाला एक आठवडा पूर्ण होत नाही तोच सास्ती तलाठी साजाच्या महिला पटवारी दिपाली परमानंद भडके हिला काल सोमवार दि २५जूलैला दुपारी एसीबीच्या अधिका-यांनी अश्याच एका लाच मागणी प्रकरणात ताब्यात घेतले असल्याचे वृत्त आहे.या प्रकरणामुळे राजू-यातच नव्हे तर जिल्हाभर एकच खळबळ उडाली असून लाचखोर (वरुर रोड मुख्यालयाचे) तलाठी गेडाम व महिला पटवारी भडके हे एकाच राजूरा मंडळातले पटवारी आहे.हे विशेष!◼⚪लाच मागणी प्रकरणात अलगद जाळ्यात अडकलेल्या ३३वर्षिय महिला तलाठी दिपाली या मूळ चंद्रपूर शहरातील तुकुम परिसरातील छत्रपती नगर येथील रहिवाशी असून त्यांनी गेल्या एक वर्षापूर्वी राजूरा तहसील अंतर्गत येत असलेल्या सास्ती तलाठी दप्तरचा (साजा क्रमांक चारचा) कार्यभार सांभाळला होता. या अगोदर त्या जिवती तालुक्यातील पाटण मंडळात पटवारी म्हणून कार्यरत होत्या .
⚪◼या घटने बाबत हाती आलेल्या माहितीनुसार असे कळते कि राजूरा येथील तक्रारदार यांनी मौजा सास्ती शेतशिवारात शेती घेतली असून सदरहू शेतीचा फेरफार करून सातबारा नावावर होण्याकरिता तक्रारदार यांनी तलाठी कार्यालय सास्ती येथे अर्ज दिला असता तलाठी दिपाली भडके यांनी शेतीचे फेरफार करून देण्याचे कामाकरीता तक्रारदार यांना लाचेची मागणी केली होती. पडताळणी दरम्यान तडजोडी अंती महिला तलाठी भडके यांनी तक्रारदार राजूरा यांचेकडे 20 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्या अनुषंगाने महिला तलाठ्यावर गुन्हा नोंद करण्यात आल्याचे समजते. ⚪◼लाच देणे व घेणे हा कायद्याने गुन्हा आहे याची तलाठी विनोद गेडाम व महिला पटवारी दिपाली भडके यांना पूर्णपणे जाणीव असतांना देखिल या दोघां पटवा-यांना लाच मागणीचा मोह आवळता आला नाही. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवायांचे जनतेंनी स्वागत केले आहे तर गलेलठ्ठ पगार घेणा-या या लाचखोर तलाठ्यांना एसीबीने ताब्यात घेतल्या बद्दल राजूरा तालुक्यातील शेतकरी वर्गांत आनंद व्यक्त केल्या जात आहे.
⚪◼उपरोक्त कालची ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, (ला.प्र.वि. नागपूर )मधुकर गिते(अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. नागपूर ) अविनाश भामरे, (पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वि. चंद्रपूर)यांचे मार्गदर्शनाखाली कारवाई पथकातील पो.नि .जितेंद्र गुरनुले, नापोशि संदेश वाघमारे, पो. शि. रोशन चांदेकर , रवी ढेंगळे, राकेश जांभूळकर, म.पो.शि. पुष्पा काचोळे ( ला.प्र.वि. चंद्रपूर) चालक पो. शि.सतिश सिडाम, ला.. प्र. वी. चंद्रपूर यांनी केली आहे.
⚪◼एसीबीचे जनतेला आवाहन!
सर्व नागरीकांना कळविण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ एसीबी कार्यालयाशी संपर्क साधावा. संपर्कासाठी खालील फोन नंबर व भ्रमनध्वनी क्रमांक देण्यांत आलेले आहे .ते असे
⚪▪अँन्टी करप्शन ब्युरो, चंद्रपूर
दुरध्वनी 07172-250251
⚪▪अविनाश भामरे, पोलीस उपअधीक्षक,
ला.प्र.वि. चंद्रपूर मो.क्र. 8888824599
पो. नि. शिल्पा भरडे मो. क्र.9850330031
पो.नी. जितेंद्र गुरनुले मो. क्र. 8888857184
⚪▪टोल फ्रि क्रं. 1064 असा आहे तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी !