नक्षल दमन विरोधी सप्ताहच्या अनुषंगाने बेस कॅम्प, मुरकुटडोह येथे डेंग्यू, मलेरिया, हिवताप, टायफाईड व पाऊसाळ्यातील विविध आजार यावर तपासणी व उपाययोजना करिता आरोग्य शिबीर आयोजित…
धर्व कुमार हुकरे
जमाकुडो प्रतिनिधी
मो: 9404839323
आज दिनांक 25/07/2023 रोजी मा. पोलीस अधिक्षक सा. गोंदिया व मा. अपर पोलीस अधीक्षक, सा. गोंदिया कॅम्प देवरी व मा.उपविभागीय पोलीस अधीकारी सा.आमगाव उपविभाग यांचे मार्गदर्शनात नक्षल दमन विरोधी सप्ताह – 2023 चे अनुषंगाने बेस कॅम्प, मुरकुटडोह येथे डेंग्यू, मलेरिया, हिवताप, टायफाईड व पाऊसाळ्यातील विविध आजार यावर तपासणी व उपाययोजना करिता आरोग्य शिबीर आयोजित केले होते. त्याकरिता प्रा. आरोग्य केंद्र चे Dr. श्री डोंगरवार व पथक उपस्थित होते. सदर कार्यक्रमात पावसाळ्याचे दिवस सुरू असुन आजारांची साथ वाढत असल्याने नागरिकांना स्वतः चे व परिवाराचे आरोग्य संबंधाने मार्गदर्शन केले. हजर ग्रामस्थांच्या विविध आजारावरील तपासणी करून औषधे देण्यात आली. तसेच नक्सल दमन सप्ताहाचे अनुषंगाने शासनाच्या विविध योजना व मावोवाद्यांचे विचार सारनिस बळी पडणार नाही या संबंधाने मार्गदर्शन केले.
सदर आरोग्य शिबिरास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
यावेळी बेस कॅम्प प्रभारी API दिनेश बागुल, PSI खामगळ, PSI कायदे, Psi पाटील व psi तिवारी तसेच srpf चे psi सिंग आणि mp hawk force व C 60 तुरकर पथक हजर होते.