नक्षल दमन विरोधी सप्ताहाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद शाळा विचारपुर येथे पाऊसाळ्यातील विविध आजार यावर तपासणी व उपाययोजना करिता आरोग्य शिबीर आयोजित केले
धुर्व कुमार हुकरे
जमाकुडो प्रतिनिधी
मो: 9404839323
दिनांक 25/07/2023 रोजी मा. पोलीस अधिक्षक निखील पिंगळे सा. गोंदिया व मा. अपर पोलीस अधीक्षक,अशोक बनकर सा. गोंदिया कॅम्प देवरी व मा.उपविभागीय पोलीस अधीकारी पुरुषोत्तम अहेरकर सा.आमगाव उपविभाग, ठाणेदार बाबासाहेब बोरसे सा.पोस्टे सालेकसा यांचे मार्गदर्शनात नक्षल दमन विरोधी सप्ताह – 2023 चे अनुषंगाने जिल्हा परिषद शाळा ग्राम- विचारपुर येथे डेंग्यू, मलेरिया, हिवताप, टायफाईड व पाऊसाळ्यातील विविध आजार यावर तपासणी व उपाययोजना करिता आरोग्य शिबीर आयोजित केले होते.
त्याकरिता प्रा. आरोग्य केंद्र दरेकसाचे Dr. श्री दीपक भोयर,अनिता पार्किवार, क्षीरसागर, व पथक उपस्थित होते. सदर कार्यक्रमात पावसाळ्याचे दिवस सुरू असुन आजारांची साथ वाढत असल्याने नागरिकांना स्वतः चे व परिवाराचे आरोग्य संबंधाने मार्गदर्शन केले. हजर ग्रामस्थांच्या विविध आजारावरील तपासणी करून औषधे देण्यात आली. तसेच नक्सल दमन सप्ताहाचे अनुषंगाने शासनाच्या विविध योजना व मावोवाद्यांचे विचार सारनिस बळी पडणार नाही या संबंधाने मार्गदर्शन केले.
सदर आरोग्य शिबिरास 100 ते 125 नागरिक व विद्यार्थी यांनी उपस्थित राहून आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
सदर आरोग्य शिबिर सशस्त्र सुरक्षेत्र दरेकसा प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हर्षल भोळे, डॉक्टर भोयर जिल्हा पोलीस व एस आर पी एफ चे पोलीस अंमलदार यांनी यशस्वीपणे पार पाडला.