पावसाळ्यात करंजाडे वसाहतीच्या घशाला कोरड, करंजाडेकरांचा सिडको विरोधात जल आक्रोश मोर्चा..

संतोष आमले

 रायगड ब्युरो चीफ

📱9220403509

 एकिकडे पावसाळा सुरु झाला असताना दुसरीकडे करंजाडे वसाहतीला तीव्र पाणी करण्यास टंचाई निर्माण झालेली आहे. करंजाडे वसाहतीत मागणीप्रमाणे पाणी मिळत नसल्याने उन्हाळयासारखीच स्थिती झाली आहे. एमजेपीच्या पाणी प्रकल्पावरील पंप नादुरुस्त झाल्याने झाल्याने करंजाडेकरांच्या घशाला कोरड पडत असल्याने मंगळवारी 25 जुलै रोजी कॉलेजफाटा येथील टर्फमधील बैठकीमध्ये करंजाडेकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी बैठकीला माजी सरपंच रामेश्वर आंग्रे, मा. उपसरपंच योगेंद्र कैकाडी, माजी पोलीस अधिकारी सी.टी. पाटील, शिवसेना निखिल भोपी, किरण पवार, पोलीस पाटील कुणाल लोंढे, चंद्रकांत गुजर यांच्यासह नागरिक महिला मोठया प्रमाणात उपास्तित होते. 

लोकप्रतिनिधीचा दुर्लक्ष : रहिवाश्यांचा नाराजीचा सुर

सिडकोची स्वःताची यंत्रणा नसल्याने पाण्याकरीता पूर्णपणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर अवलंबून राहावा लागत आहे. त्यातुलनेत एमजेपीकडून कमी पाणी दिले जाते. याचे कारण म्हणजे जुनाट झालेल्या जलवाहिन्या होय. त्यांना फुटीचे ग्रहन लागले असल्याने मुबलक जास्त दाबाने पाणी दिले जात नाही. या शिवाय भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र आणि वायाळ येथील पंप नादुरुस्त असल्याने पंपिग बंद पडते. यामुळे एमजेपी सिडकोला पाणीपुरवठा करीत नाही यामुळे गेल्या काही दिवसापासून करंजाडे वसाहतीला पाण्याची टंचाई भासत आहे. एमजेपी आणि सिडको यांच्या घोळात मात्र करंजाडेकरांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. यावेळी पाणी सुरळीत होण्याकारिता करंजाडे महाविकास आघाडीकडून पाठपुरावा सुरु आहे. याबाबत एमजेपी व सिडकोला पत्रव्यवहार देखील केला आहे. मात्र यावर एमजेपी व सिडकोकडून कोणताही उपाययोजना न झाल्याने करंजाडे वसाहतीतील नागरिक पाण्याविनाच असल्याने माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्याकडे नागरिकांनी पाणी पुरवठ्याबाबत तोंडी तक्रारी मांडल्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने करंजाडे वसाहतीतील नागरिकांकडून सिडको विरोधात काढण्यात येणाऱ्या जल आक्रोश मोर्चाचा आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधी विरोधात नाराजीचा सुर उमटला. त्याचबरोबर 3 ऑगस्ट रोजी सिडको भवनवर जल आक्रोश मोर्चा काढण्याचे ठरले. यावेळी त्रस्त नागरिक व महिलांनी आपली मत मांडली.

कोणतीही पक्ष, संघटना नाही “फक्त नागरिक” म्हणून निघणार मोर्चा..

करंजाडे वसाहतीचा पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. याबाबत एमजेपी, सिडको कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याने आता नागरिक स्वतः हुन रस्त्यावर उतरत असून 3 ऑगस्ट 2023 रोजी सिडको विरोधात काढण्यात येणारा जल आक्रोश मोर्चा हा कोणतीही संघटना किंवा पक्षाचा नसून करंजाडे नागरिक म्हणून मोर्चा काढण्यात येणार असल्याचे आढाव बैठकीत करंजाडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी सांगितले.

पाण्याच्या जल आक्रोश मोर्चासाठी महिलांनो बाहेर पडा..

मला सिडकोकडून पाणी पाहिजे. पाणी माझ्या हक्काच नाही कुणाच्या बापाचं.. महिलांनो घरात बसून करताय काय 3 ऑगस्टच्या मोर्चासाठी बाहेर पडा. असे बैठकीला महिलांनी आक्रोश व्यक्त करीत करंजाडे वसाहतीतील महिलांना आव्हान केले.

 

पाणी प्रश्न सुटेपर्यत कोणताही टॅक्स, पाणी बिल भरणार नाही.

 

करंजाडे वसाहतीची निर्मिती करतेवेळी येथील सिडकोच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सुविधेकडे सिडकोचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. त्याचबरोबर आम्ही सिडकोचे सर्व टॅक्स भरून फ्लॅट खरेदी केला. त्याचबरोबर पाणी बिल वेळेवर भरत असून देखील आम्हाला सिडको वेळेवर पाणीच देता येत नसेल तर आम्ही सिडकोला टॅक्स का देऊ. त्याचबरोबर पाणी बिल देखील भरणार नसल्याचे महिलांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here