सरकारी अधिका-याची अलिशान केबीन बनविण्यासाठी नैसर्गीक आपत्ती निधीचा वापर?

सरकारी अधिका-याची अलिशान केबीन बनविण्यासाठी नैसर्गीक आपत्ती निधीचा वापर?

अधिकारी बदलला की नवीन अधिकारी बनवितो अलि शान केबीन. शासकीय पैशांची होतेय उधळपट्टी

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- सरकारी अधिका-याची अलिशान केबीन बनविण्यासाठी नियमबाहयरितीने नैसर्गीक आपत्ती निधीचा वापर करण्यात आल्याची चर्चा सरकारी वर्तुळात सुरू आहे. नैसर्गिक आपत्ती निधीचा उपयोग नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या लोकांच्या मदतीसाठी, पुनर्वसन आणि पुनर्रचनेसाठी तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी केला जातो. यामध्ये तात्काळ मदत, वैद्यकीय सुविधा, निवारा, अन्न, पिण्याचे पाणी, तसेच आपत्तीनंतरच्या उपाययोजना जसे की रस्ते दुरुस्ती, घरे बांधणे, आणि पुनर्वसन यांचा समावेश होतो. परंतु या निधीचा वापर एका अधिका-याने स्वतःच्या अलिशान दालनाच्या सजावटीसाठी केल्यामुळे आश्यर्य तसेच नाराजी व्यक्त केली जात असून शासनाने याबाबत जिल्हयातील सर्व अधिका-यांच्या दालनांवर कोणत्या निधीमधून खर्च करण्यांत आला आहे याची चौकशी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
नैसर्गिक आपत्ती निधीचा वापर नियमांनुसारच करणे आवश्यक आहे. जर निधीचा वापर नियमांनुसार केला नाही, तर ते नियमबाह्य ठरते. यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी सरकार किंवा इतर संस्था निधी देतात.या निधीचा वापर नियमांनुसार, म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत बाधित व्यक्तींना मदत करणे, पुनर्वसन करणे किंवा आवश्यक सुविधा पुरवणे यासाठीच करणे आवश्यक आहे.जर निधीचा वापर या नियमांनुसार न करता इतर कामांसाठी किंवा वैयक्तिक फायद्यासाठी केला, तर तो नियमबाह्य ठरतो.जर पूरग्रस्त भागासाठी आलेला निधी बाधित लोकांच्या घरांसाठी किंवा पुनर्वसनाच्या कामासाठी वापरला नाही, तर तो नियमबाह्य वापर ठरतो.नियमबाह्य वापर केल्यास संबंधित व्यक्ती किंवा संस्थांवर कारवाई होऊ शकते. तसेच, निधीचा गैरवापर झाल्यास, बाधित लोकांना मदत मिळण्यास अडचणी येऊ शकतात. आपत्ती व्यवस्थापन कायदाः या कायद्यात नैसर्गिक आपत्ती आणि त्यावरील उपाययोजनांची माहिती दिलेली आहे. या कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे.निधीचा वापर कसा केला जात आहे, याबाबत अधिकाधिक पारदर्शकता ठेवणे आवश्यक आहे.
नैसर्गिक आपत्ती निधीमधून सरकारी अधिकारी अलिशान केबीनवर उधळपट्टी करीत असतील तर ती जनतेशी प्रतारणा आहे असे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.