कर्तव्य दक्ष तहसीलदार संतोष खांडरे यांचा सत्कार

हिंगणा तालुका जिल्हा नागपूर
देवेंद्र सिरसाट
हिंगणा : -तहसीलदार संतोष खांडरे यांनी तालुक्यात सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासह अवैध उत्खनन करून शासनाचा महसूल बुडवनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करत शासनाला महसूल उपलब्ध करून दिला त्या कार्याची दखल घेऊन भुमी मुक्ती मोर्चा चे नागपूर जिल्हा अध्यक्ष तथा भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते इस्त्राईल महाजन यांनी आपल्या तमाम कार्यकर्त्यां सोबत तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार संतोष खांडरे यांचा सत्कार केला.यावेळी माजी पोलीस अधिकारी दिपक रणदिवे,रामचेंद्र भांगे, घनशाम गायकवाड, पत्रकार गजानन ढाकुलकर, इत्यादी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.सत्काराला उत्तर देताना तहसीलदार संतोष खांडरे म्हणाले की मी शासनाचा प्रतीनिधी असल्यामुळे मला शासनाच्या मालमत्तेचे संरक्षण करायचे असते जर का कुणी अवैध रित्या या मालमत्तेला नुकसान पोहोचत असेल तर मात्र मला कायदेशीर कारवाई करून शासनाच्या मालमत्तेचे रक्षण करणे व महसूल गोळा करणे हे माझं आद्य कर्तव्य आहे.जर का कुणी अवैध उत्खनन करून शासनाचा महसूल बुडवण्याचा प्रयत्न केला तर मात्र आम्ही सोडणार नाही.