महिला काँग्रेसने बांधल्या जनसेवकांना राख्या.
आरोग्यसेवक, पोलीस, न प सफाई कामगार, प स कर्मचाऱ्यांना राख्या बांधून व्यक्त केल्या संवेदना.

आरोग्यसेवक, पोलीस, न प सफाई कामगार, प स कर्मचाऱ्यांना राख्या बांधून व्यक्त केल्या संवेदना.
✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
राजुरा :– आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्नाखाली राजुरा येथे राजुरा तालुका व शहर महिला काँग्रेसने रक्षाबंधनचे औचित्य साधून राजुरा शहरातील आरोग्यसेवक, पोलीस, न. प. सफाई कामगार, प. स. कर्मचारी या जनतेच्या सेवकांना राख्या बांधून कोरोना सारख्या संकट काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता निरंतर जनसेवा केल्याबद्दल त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला. तर समस्त महिला भगिनींच्या रक्षणासाठी सदैव तत्पर राहून सहकार्य करण्याचे वचन घेतले.
या प्रसंगी जि. प. सदस्य मेघाताई नलगे, महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा कविता उपरे, शहराध्यक्षा तथा नगरसेविका संध्या चांदेकर, प स सदस्य कुंदाताई जेणेकर, नगरसेविका दिपा करमनकर, साधना भाके, अर्चना गर्गेलवार, संगीता मोहुर्ले, ज्योती ठावरी, सुमित्रा कुचनकर, पुनम गिरसावळे, योगिता मटाले, पुष्पवर्षा जुलमे, विना गोप, अंजली गुंडावार, रेखा बोढे, कल्पना मेशट्टीवार यासह अनेक महिला कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.