प्रधानमंत्री आवास योजना तसेच घरकुल योजनेंतर्गत उत्कृष्ठ काम केलेल्याच्या आमदार कुणावार यांचे हस्ते सत्कार*

*प्रधानमंत्री आवास योजना तसेच घरकुल योजनेंतर्गत उत्कृष्ठ काम केलेल्याच्या आमदार कुणावार यांचे हस्ते सत्कार*

प्रधानमंत्री आवास योजना तसेच घरकुल योजनेंतर्गत उत्कृष्ठ काम केलेल्याच्या आमदार कुणावार यांचे हस्ते सत्कार*
प्रधानमंत्री आवास योजना तसेच घरकुल योजनेंतर्गत उत्कृष्ठ काम केलेल्याच्या आमदार कुणावार यांचे हस्ते सत्कार*

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा

समुद्रपूर:-तालुकास्तरीय मूल्यांकन समितीने निवड केलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तालुक्यातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत तसेच कार्यक्षेत्रातील सर्वोत्कृष्ट घरकुल ग्रामपंचायतीचे तसेच लाभार्थीना पुरस्कार वितरण सोहळा आज दिनांक २५ ऑगस्ट रोजी स्थानिक पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आला याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आमदार समीर भाऊ कुणावार, पंचायत समिती सभापती सुरेखा ताई कैलास टिपले, जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य सभापती मृणालताई माटे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. नितीनजी मडावी,पंचायत समिती उपसभापती श्री. योगेश फुसे, जिल्हा परिषद सदस्य श्री. रोशन चौके, जिल्हा परिषद सदस्या सौ. शुभांगीताई डेहणे, पंचायत समिती सदस्य श्री. वसंतराव घुमडे , श्री. सुनील डुकरे, माजी प. स. सभापती कांचनताई मडकाम, पुष्पांजलीताई नेवल, प. स. सदस्य शांताराम बागडे, जयश्रीताई दांडेकर ,पुष्पाताई जुनघरे, BDO यावले साहेब तसेच सरपंच सचिव व घरकुल लाभार्थी उपस्थित होते..
पुरस्कार वितरण कार्यक्रम
महाआवास अभियान -ग्रामिण मधील उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था तसेच व्यक्तींना महा आवासअभियान (ग्रामिण) अंतर्गत पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमप्रसंगी आमदार
समीरभाऊ कुणावार यांचे शुभहस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.
यावेळी महाआवास अभियान ग्रामिण मधील उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींना महा आवासअभियान ( ग्रामिण) अंतर्गत दोन योजनेचा समावेश आहे.त्याअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कत
आवास योजना या दोन्ही योजनेतून ज्या लाभार्थ्यांनी सर्वोत्कृट घरकुल बांधले आणि ज्या ग्रामपंचायतीने या योजनेचे चांगले काम केले अशा लाभार्थ्याचा आणि ग्रामपंचायतीचा आमदार समिर कुणावार यांनी सत्कार करीत सन्मानचिन्ह बहाल केले.
यावेळी सरपंच , ग्रामसेवक, लाभार्थी इतर कर्मचारी,अधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमप्रसंगी आमदार कुणावार यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.