चिमुर शहरातील नविन वस्ती आबादी मधील नगरपरिषदेच्या सार्वजनिक जागेवर करीत आहे एक इसम कंपाऊंड घालून कब्जा

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
Mo 9096817953
चंद्रपूर : – चिमूर नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या पिंपळनेरी प्रभाग क्र. ३ मधील नवीन वस्ती आबादी येथे ३५ वर्ष पुरातन आणि हि नगर परिषदेची सार्वजनिक जमिन आहे. या विहिरीच्या जागेवर सुधीर भोयर व हरिदास शिंदे यांनी अतिक्रमण केले आहेे.
याची महिलांनी हितंभूत माहिती घेऊन स्थानिक जनतेच्या पिण्याच्या पाण्यासाठी हि जमीन नियोजित असून अनेक निवेदने,तोंडी तक्रारी , विहीर उपसा करण्याची मागणी केली असतांना नगर परिषदेच्या दुर्लक्षित धोरणामुळे यची पुनःश्च दखल घेऊन ६० महिलांनी समोर येऊन नगर परिषद चिमूर येथे निवेदनाच्या माध्यमातून तक्रार केली आहे.नगर परिषदने योग्य ती चौकशी करून अतिक्रमण हटविण्यात यावे अशी या निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली आहे.या वस्ती मध्ये अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी नळाची सुविधा नसून एकाच हॅन्ड पम्प चे पाणी स्थानिक नागरिक पित असतात परंतु तरीही शासनाला याची जाणीव झाली नाही. म्हणून नवनियुक्त नगर परिषद चिमूर च्या मुख्याधिकारी यांनी याची दखल घ्यावी अशी स्थानिकांची मागणी आहे.