सद्यस्थितीत भारताची अवस्था ही “कुंपणच शेत खातय”अशी झाली आसुन दिल्ली से गल्ली तक भ्रष्टाचार विरोधी कायद्याची अंमलबजावणी होणे गरजेचे  

शहानवाज मुकादम 

रोहा शहर प्रतिनिधी

मो.7972420502

रोहा: आज भारत सर्वच क्षेत्रात प्रगती करत आहे.माहिती तंत्रज्ञान असो किंवा शिक्षण सगळी कडे ही प्रगती दिसुन येते. पण या देशाची एक काळी बाजु आहे ती म्हणजे भ्रष्टाचार. काही लोक पैशाच्या हव्यासापोटी लाच द्यायला आणि घ्यायला मागे -पुढे पाहत नाहीत. या सारख्या लोकांमुळेच भ्रष्टाचार सर्रास सुरु आहे.खरेतर पैसे खाणे या सारखी लाजिरवाणी घृणास्पद गोष्ट नाही. आवश्यक तो कर योग्य वेळी भरावा लागतो,पण तो न भरण्या साठी आणि लालसेपोटी हाच काळा पैसा काही लोक लपवतात. अनेकांनी काळ्या पैशातून कमावलेला मालमत्ता पाहिला की डोळे विस्फारतात. कोट्यवधींची घर सोने-चांदी,प्रचंड प्रमाणात रोकड त्यांनी साठवून ठेवले आसते.हे सगळं थांबायला हवं,अज महागाई वाढल्याने जगणे कठीण होतं.भ्रष्टाचाराला देशाबाहेर काढण्या साठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत.या भारताचे नागरीक म्हणून ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.

तरुणाईनेच पुढाकार घ्यायला हवा.

एक ही क्षेत्र असं नाही जिथे भ्रष्टाचार पोहोचलेला नाही.गुन्हा करणारा जितका मोठा गुन्हेगार असतो, त्याहुन ही मोठा गुन्हेगार गुन्हा सहन करणारा असतो. पण आजची तरुण मंडळी भ्रष्टाचाराला नक्कीच आळा घालू शकते.भ्रष्टाचारा च्या भस्मासुराचा वेळीच बळी घेतला नाहीतर तो भारताचा विध्वंस केल्या विना शांत होणार नाही.समाजातील भ्रष्टाचाराची मुळे उपटुन उपटुन स्वच्छ जिवनाचा पाया घातला पाहीजे.देशाला बदलण्याची सुरुवात अपल्या स्वतःपासुन करण्या ची जास्त गरज आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध रणशिंग फुकुन भ्रष्टाचार निर्मूलन स्वतःपासुन करुया आणि मग अभिमानाने म्हणू शकतो.

मेरा देश महान है,प्राणोसे भी प्यारा मुझको मेरा हिंदुस्थान है

अस आसुन देशाचा चौथा स्तंभ स्वतःला म्हणनारे काही प्रतिनिधी ही भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आसल्याचे स्पष्ट दिसत आहेत. 

रोहा पंचायत समिती सेस फंडअंतर्गत झालेल्या अनेक कामात तफावत व अनियमिता आसुन ग्रामपंचायत खांबेरे येथील बिरवाडी कब्रस्तान मुरुम टाकणे चे काम न करता बिल लाटले ची तक्रार केली आसुन पंचायत समिती करुन जाणुन बुजून कारवाई करण्यात दिरंगाई होत आहे.

मा.मुख्यमंत्री यांची भेट घेऊन सदर च्या भ्रष्टाचारा ची चौकशीअंत कारवाई ची मागणी करणे आवश्यक आहे,कारण नेते मंडळी व काही प्रतिनिधी संबंधित सरपंच ठेकेदार व अधिकारी यांना वाचविण्याचा विडाच घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे.

तक्रार माघार घेणे बाबत अनेक प्रकार चे दबाव टाकणे आमिष दाखवणे खोट्या नाट्या केसेस करुन अडकविणे च्या धमक्या देणे असे अनेक प्रकार रोजच ऐकायला मिळतात.तरी जिल्हापरिषद पंचायत समिती व ग्रामपंचायती च्या निवड नुका समोर आल्याने तरुणाईने सहभाग घेऊन पुढे होणारे भ्रष्टाचार थांबविने बाबत पुढाकार घेणे देशाच्या हिताचे आसुन दिल्ली ते गल्ली पर्यंत भ्रष्टाचार मुक्त करण्याचे पुढाकार घेणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here