एस एस निकम इंग्लिश स्कूल, इंदापूर मध्ये सॅनिटरी नॅपकीन व्हेंडींग मशीन आणि डिस्पोजल मशीनचे उद्घाटन

✍️मृणाली जाधव 

माणगांव तालुका प्रतिनिधी

मो: 70834 51685

एस.एस. निकम इंग्लिश स्कूल इंदापूरने 23/08/23 रोजी आधुनिक सॅनिटरी पॅड व्हेंडिंग आणि डिस्पोजल मशिन्सचे उद्घाटन करून शाळेतील किशोरवयीन मुलींमध्ये सॅनिटरी नॅपकिन व वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात पर्यावरणातील प्रदूषण रोखण्याबाबत जाणीव जागृती करण्यात आली. सॅनिटरी नॅपकिन उघड्यावर फेकून न देता मशीनद्वारे विल्हेवाट लावता येते. याविषयी प्रख्यात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. श्रुती निकम यांनी मार्गदर्शन केले. अशा या प्रकारे पर्यावरणपूरक उपक्रमाबाबत हातभार लावण्यात आला. यावेळी शाळेतील किशोरवयीन मुली व महिला पालक यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. महिलांचे आरोग्य आणि स्वच्छता या विषयावरील व्याख्यान हे या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य होते.

या कार्यक्रमाला व्हेंडींग मशीनच्या वितरक सौ. मंजिरी उधोजी, सौ.कोमल बल्की मॅडम उपस्थित होत्या.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माणगाव एज्युकेशन ट्रस्ट मेंबर व एस.एम.सी चेअरमन सौ. संपदा 

कुळकर्णी मॅडम उपस्थित होत्या.तसेच एस.एम.सी सेक्रेटरी व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रंजीता जाधव मॅडम, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. संचिता जाधव मॅडम, पूर्व प्राथमिक विभागाच्या प्रमुख सौ.पाटील मॅडम उपस्थित होत्या. शाळेच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सौ.मधुरा खातू मॅडम तसेच शाळेतील किशोरवयीन मुली व महिला पालक वर्ग, महिला शिक्षक व शिक्षकेतर वर्ग उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here