शहरातील दहाही झोन कार्यालयांमधील नागरी आरोग्य प्राथमिक केंद्रानुसार नागरिकांकरिता अँटी-रेबिज लसीकरण अर्थात एआरव्ही केंद्र सुरू करावे निर्देश

शहरातील दहाही झोन कार्यालयांमधील नागरी आरोग्य प्राथमिक केंद्रानुसार नागरिकांकरिता अँटी-रेबिज लसीकरण अर्थात एआरव्ही केंद्र सुरू करावे निर्देश

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी अधिकाऱ्यांना दिले.

✍🏻मंजुषा सहारे✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो.9373959098

नागपूर :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की शहरातील भटके कुत्र्यांची वाढती संख्या व कुत्र्यांनी चावा घेतल्यानंतर करावयाच्या उपाययोजनांच्या संदर्भात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज (ता.२६) महानगरपालिका मुख्यालयातील सभाकक्षात अधिकारी व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, उपायुक्त श्री. राजेश भगत, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी स्वप्निल लोखंडे उपस्थित होते.